Short News

सनी लिओनी सोशल मीडियावर जास्तच अॅक्टिव

सनी लिओनी सोशल मीडियावर जास्तच अॅक्टिव

अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर भरपूर अॅक्टिव असते. आपल्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करण्यात ती कायम व्यस्त असते. नुकताच तीने आपला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोवर युझर्सने कमेंट करून ट्रोल केलं आहे. सनी आता लोकप्रिय शो मॅन वर्सेस वाइल्ड च्या शुटिंगमध्ये बिझी आहे. याच गोष्टीची माहिती तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे.
अमेरिकेच्या विरोधात पाकला सौदी अरेबिया,तु्र्कस्तान, चीनची मदत

अमेरिकेच्या विरोधात पाकला सौदी अरेबिया,तु्र्कस्तान, चीनची मदत

अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारी फंडिग बंद करण्यात आली. परंतु अमेरिकेच्या या निर्णयाविरोधात पाकिस्तानच्या बाजूने चीन , सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान उभे राहिले आहेत. अमेरिकेच्या माध्यमांनी याविषयीची वृत्त दिले आहे. पाकिस्तान याला आपले यश मानत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे ट्रम्प प्रशासन आपले दहशतवादाविरोधात आपले प्रयत्न करत आहेत. 
अभिनेता इरफान खानला काविळने झपाटले

अभिनेता इरफान खानला काविळने झपाटले

अभिनेता इरफान खान सध्या काविळने त्रस्त झाला आहे. त्याच्या या आजारामुळेच त्याच्या सिनेमांचे चित्रीकरणही थांबवण्यात आले आहे. इरफानला द मिनस्ट्री या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी पंजाबला जायचे होते. या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर लगेच तो ब्लॅकमेल या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनला सुरूवात करणार होता. पण आता काविळ झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे.
जोगेश्वरीत केमिकल कंपनीला भीषण आग

जोगेश्वरीत केमिकल कंपनीला भीषण आग

जोगेश्वरी येथील धील ईशांत कंपाऊंडमधील एशियन केमिकल कंपनीला गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थ असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु आहे.