Short News

जुन्या काळाची आठवण करणारा ‘सुई धागा' चित्रपटाचा फर्स्ट लूक

जुन्या काळाची आठवण करणारा ‘सुई धागा' चित्रपटाचा फर्स्ट लूक

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या ‘सुई धागा' चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. सर्व चाहत्यांचे लक्ष वेधले. सुई धागा'च्या फर्स्ट लूकमध्ये अनुष्का ही ‘ममता' या सामान्य स्त्रिच्या वेशात दिसते.तर ‘मौजी' ही व्यक्तिरेखा साकारणारा वरुण त्याच्या लूकने आपल्याला जुन्या काळात घेऊन जातो. चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत वरुणने ‘EXCLUSIVE-मौजी और ममता से मिलिए २८ सितम्बर को,असे लिहिले आहे.
विश्वचषक जिंकणे माझे स्वप्न नाही- एबी डिवीलिअर्स

विश्वचषक जिंकणे माझे स्वप्न नाही- एबी डिवीलिअर्स

2019 चा विश्वचषक जस जसा जवळ येत आहे तसे अनेक खेळाडूंची विधाने समोर येत आहेत. त्यातच दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिवीलिअर्सने माध्यामांशी बोलताना मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेकांना धक्काच बसला आहे. 2019 चा विश्वचषक जिंकणे हे माझे अंतिम स्वप्न नसल्याचे एबी डिवीलिअर्स म्हणाला. आपले विचार बदलले असून आपण एकावेळी एकाच स्पर्धेचा विचार करत असल्याचेही तो म्हणाला. 
शेतकऱ्यांना 2001 पासून कर्जमाफी देण्यास मंजुरी

शेतकऱ्यांना 2001 पासून कर्जमाफी देण्यास मंजुरी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ 2001 ते 2009 या कालावधीतील थकबाकीदार शेतकऱ्यांना देण्याविषयीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे 2008 व 2009 च्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल. इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊस यासाठी 2001 ते 2016 दरम्यान घेतलेल्या मात्र थकीत राहिलेल्या कर्जाचाही यात समावेश आहे. 
नायजेरियात अज्ञातांचा चर्चवर हल्ला, 19 जणांचा मृत्यू

नायजेरियात अज्ञातांचा चर्चवर हल्ला, 19 जणांचा मृत्यू

नायजेरियात एका चर्चवर काही बंदुकधारी हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात किमान 19 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांमध्ये चर्चच्या दोन मुख्य धर्मोपदेशकांचाही समावेश आहे.  मंगळवारी सकाळी हा हल्ला झाला. मध्य नायजेरियाच्या बेन्यू प्रांतातील एका गावातील चर्चवर हा हल्ला करण्यात आला. जवळपास 30 हल्लेखोरांनी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्यांवर हल्ला केला.