Short News

ट्विटरवर नरेंद्र मोदींचे ६० टक्के ‘फेक फॉलोअर्स’

ट्विटरवर नरेंद्र मोदींचे ६० टक्के ‘फेक फॉलोअर्स’

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवर सुमारे ६० टक्के फेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे जगातील नेत्यांच्या तुलनेत सर्वाधिक फेक फॉलोअर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासूनच नरेंद्र मोदी ट्विटरवर सक्रिय आहेत. ट्विटरने केलेल्या ऑडिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ६० टक्के फॉलोअर्स बनावट असल्याची बाब समोर आली आहे.
दिग्गज कंपन्यांच्या गाड्यांवर लाखो रुपायांची सूट

दिग्गज कंपन्यांच्या गाड्यांवर लाखो रुपायांची सूट

ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये डिस्काऊंटचा पाऊस पडत आहे. देशातील दिग्गज कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या मॉडेल्सवर भरपूर सूट दिली आहे. मारूती सुझुकी, ह्युंडई, होंडा सारख्या कार कंपन्यांच्या बुकिंगवर मोठी सूट देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये डिस्काऊंटसोबतच स्वस्त इंश्युरन्स स्कीम, एक्सचेंज ऑफर आणि वॉरंटी स्किमचा देखील सहभाग आहे. मारूती सुझुकीकडून डिलरशिप लेवलवर डिस्काऊंट आणि एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे.
'शाही जीवन जगणे हा माझा व्यक्तीगत प्रश्न'

'शाही जीवन जगणे हा माझा व्यक्तीगत प्रश्न'

सौदी अरबचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी आपली शाही जीवन शैली, स्वत:वर खर्च करने हा आपला व्यक्तीगत प्रश्न असल्याचे सांगितले. आपल्या चुलत भावाला बेदखल करत त्यांनी स्वत:ला क्राऊन प्रिन्स घोषित केले. त्यानंतर त्यांनी देशातील भ्रष्टाचारी लोकांविरोधात बंड पुकारले आहे. यादरम्यान त्यांच्यावर शाही जीवन जगणे, स्वत:वर अमाफ पैसा खर्च करणे असे आरोप झाले आहेत.यावर त्यांनी हा आपला प्रश्न असल्याचे सांगितले.
बॉलीवूडची देसी गर्ल आता दिसणार 'भारत' मध्ये

बॉलीवूडची देसी गर्ल आता दिसणार 'भारत' मध्ये

हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा झेंडा रोवल्यानंतर बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा भारतात परत येत आहे. परतीनंतर प्रियंका-सलमानची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास जफर यांच्या भारत या सिनेमात प्रियंका सलमान खानसोबत झळकणार आहे. याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी रिपोर्टनुसार अली अब्बास यांनी न्युयॉर्कमध्ये प्रियंकाची भेट घेतली.