Short News

९० हजार तरुणांना भारतीय रेल्वेत नोकरी मिळण्याची संधी

९० हजार तरुणांना भारतीय रेल्वेत नोकरी मिळण्याची संधी

भारतीय रेल्वेने नोकऱ्यांची माहिती जाहीर केली असून तरुणांना त्याचा लाभ घेता येणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये ९० हजार नोकऱ्या उपलब्ध असल्याची माहिती रेल्वेने नुकतीच दिली आहे. याबाबतची विस्तृत माहितीही रेल्वेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली. यामध्ये ६२,९०७ नोकऱ्या केवळ १० वी पास झालेल्यांसाठी उपलब्ध आहेत. ट्रॅक मेंटेनर, गेटमन, पॉईंटसमन, पोर्टर, हेल्पर यांसारख्या पदांसाठी या जागा आहेत. 
विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांचे भाऊ प्रमोद गोएंका यांचं आफ्रिकन देश मोझॅम्बिकमधून अपहरण झाल्याची माहिती आहे. शनिवारपासून प्रमोद गोएंका बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. प्रमोद काही वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायातून बाहेर पडले होते. त्यांनी स्वतःचा दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे.
सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

पीएनबी घोटाळ्यानंतर गडगडलेल्या शेअर बाजार मंगळवारी सावरलेला दिसला. आज सकाळच्या सत्रात सेंसेक्समध्ये 150 अंकाची तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीमध्ये 40 अंकाची वाढ झाली आहे. सध्या सेंसेक्स 33926.57 वर व्यवहार करत असून निफ्टी मध्ये 10417.35 अंकाची वाढ आहे. तरीही बँकेचे शेअर खाली येत आहे.
ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल देसाई यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल देसाई यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेत्या माजी आमदार कमल देसाई यांचे गोरेगाव येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या. कमल देसाई ह्या आणीबाणीच्या काळात तरुंगात होत्या. त्यांनी मृणाल गोरे यांच्यासह अनेक आंदोलनात सहभाग घेतला. गोरगरीबांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलन केले.