Short News

गँगस्टर अबू सालेमने योगी आदित्यनाथांना मागितली मदत

गँगस्टर अबू सालेमने योगी आदित्यनाथांना मागितली मदत

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी गँगस्टर अबू सालेमने योगी आदित्यनाथ सरकारला पत्र लिहिलं आहे. पत्रात अबू सालेमने आपली वारसाहक्काने मिळणारी जमीन काही लोकांनी जबरदस्तीने बळकावली असल्याचा आरोप करत मदत मागितली आहे. उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात अबू सालेमच्या पूर्वजांची जमीन आहे.
व्लादीमिर पुतिन यांच्या विजयावर पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

व्लादीमिर पुतिन यांच्या विजयावर पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

रशियामध्ये व्लादिमीर पुतिन यांची परत सत्ता आली आहे. पुतिन चौथ्यावेळेस राष्ट्रपती बनणार आहेत. त्याच्या विजयावर भारताचे पंतप्रधान मोदी यांनी फोनवरुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रशियाशी भारत व्यापारासह शस्त्रे खरेदी केले आहेत. एक्झिट पोलनुसार पुतिन यांना 70 टक्के पेक्षा जास्त मत मिळणार असल्याचे दिसत आहे. 
सलमान खानच्या प्रेयसीसोबत वरुण करणार डान्स

सलमान खानच्या प्रेयसीसोबत वरुण करणार डान्स

कोरिओग्राफरपासून दिग्दर्शक झालेल्या रेमो डिसूझाचे एबीसीडी आणि ‘एबीसीडी २' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलेच गाजले. डान्सवर आधारित या दोन्ही चित्रपटांनी बॉलिवूडमध्ये एक नवीन ट्रेण्ड तयार केला. आता याच चित्रपटाचा तिसरा भाग सध्या जोरदार चर्चेत आहे. रेमोच्या या चित्रपटात अभिनेता वरुण धवन आणि कतरिना कैफ ही जोडी दिसणार आहे. 
दहावीचा समाजशास्त्राचा पेपर व्हॉटसअॅपवर व्हायरल, पोलिसात तक्रार

दहावीचा समाजशास्त्राचा पेपर व्हॉटसअॅपवर व्हायरल, पोलिसात तक्रार

दहावीच्या समाजशास्त्र विषयाची इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना कल्याण तालुक्यातील वरप गाव येथील सिक्रेड हार्ट शाळेमध्ये घडली. या शाळेतील विद्यार्थ्याला आज सकाळी साडेनऊ वाजता व्हॉटसअॅपवर समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळाली आहे. याबाबात टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.