Short News

अलाहाबादमध्ये झळकली भाजप नेत्यांना मनाई करणारे पोस्टर्स

अलाहाबादमध्ये झळकली भाजप नेत्यांना मनाई करणारे पोस्टर्स

उत्तर प्रदेश आणि देशातील बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अलाहाबादमध्ये नागरिकांनी भाजपचा अनोख्या प्रकारे निषेध केला आहे. 'भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना येथे येण्यास मनाई आहे. येथे महिला आणि लहान मुली राहतात', अशी पोस्टर्स आणि बॅनर्स अनेक गल्ल्यांमध्ये आणि चौकांमध्ये नागरिकांनी लावली आहेत. शिवकुटी भागात नागरिकांनी आपल्या घराबाहेर अशा प्रकारचे पोस्टर्स लावलेले दिसत आहेत. 
अल्टो कार उतरली ग्राहकांच्या पंसतीस,  कार विक्री वाढली

अल्टो कार उतरली ग्राहकांच्या पंसतीस, कार विक्री वाढली

देशात मारुती आल्टो सर्वात जास्त कार विक्री होणारी कार बनली आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या 10 प्रवाशी कारच्या यादीत 7 मॉडेल मारुती कंपनीचे आहेत. तर हुंदाई कंपनीचे तीन मॉडेल आहेत. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम),ऑटोमोबाईल उत्पादक समूहाने शुक्रवारी ही यादी प्रसिद्ध केली आहे. यात मारुतीची कार विक्री यावर्षी 6.99 टक्क्यांनी वाढली आहे. 
उत्तर कोरियात 40 वर्षांनी हुकूमशहाची पत्नी फर्स्ट लेडी घोषित

उत्तर कोरियात 40 वर्षांनी हुकूमशहाची पत्नी फर्स्ट लेडी घोषित

अमेरिकेशी चर्चेसाठी तयार झालेल्या उत्तर कोरियामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. गुरुवारी हुकूमशहा किम जोंग ऊनने आपली पत्नी री सोल जू यांना फर्स्ट लेडी घोषित केले. उत्तरकोरियात 40 वर्षांनंतर हा सन्मान झालेला पाहायला मिळाला.  पत्नीचे स्टेटस वाढवण्यामागे किमचा उद्देश अमेरिकी राष्ट्राध्यक्षासोबत होणारी शिखर वार्ता आहे.  
'पानीपत'साठी उभारला जातोय हुबेहूब शनिवारवाडा

'पानीपत'साठी उभारला जातोय हुबेहूब शनिवारवाडा

सिनेदिग्दर्शक, निर्माता आशुतोश गोवारीकर आपली स्टाइल कायम राखत 'पानीपत' नावाचा चित्रपट बनवत आहे. त्यासाठी आशुतोष भव्य असा शनिवारवाडा जसाच्या तसा उभारणार आहे. आशुतोषने हुबेहूब शनिवारवाडा उभारण्याची संपूर्ण जबाबदारी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर सोपवली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शनिवारवाडा उभारणीच्या कामाला सुरुवातही करण्यात आली.