Short News

मक्का मशिद बाँबस्फोट :  स्वामी असीमानंदसह पाच आरोपी दोषमुक्त

मक्का मशिद बाँबस्फोट : स्वामी असीमानंदसह पाच आरोपी दोषमुक्त

हैदराबादमधील मक्का मशिदीत 18 मे 2007 मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंदसह पाच आरोपींनी एनआयएच्या विशेष न्यायालयाने दोष मुक्त केले आहे. या बॉम्बस्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता. तर 58 जण जखमी झाले होते. हैदराबाद बॉम्बस्फोटांमध्ये 10 आरोपी होते. हे सर्व जण अभिनव भारत या संघटनेशी संबंधित आहे. या बॉम्बस्फोटानंतर आंदोलन करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता.
Tambo कंपनीचे तीन स्मार्टफोन लॉन्च

Tambo कंपनीचे तीन स्मार्टफोन लॉन्च

 टॅम्बो  कंपनीने आपले मोबाईल्स भारतीय बाजारात पहिल्यांदा उतरवले आहेत. कंपनीने तीन स्मार्टफोन आणि सहा फिचर फोन्स लॉन्च केले आहेत. हे स्मार्टफोन आणि फिचर फोन सुपरफोन्स आणि पॉवरफोन्स च्या श्रेणीतील आहेत. यांची किंमत ही 600 रुपयांपासून ते 7 हजार रुपयांपर्यंत आहेत. टॅम्बोने सीईओ सुधीर कुमार म्हणाले की, भारतीय बाजारात टॅम्बो आणू चांगले वाटत असल्याचे ते म्हणाले.  
लोकप्रिय Pulsar 150 आली नव्या अवतारात

लोकप्रिय Pulsar 150 आली नव्या अवतारात

बजाज ऑटो लिमिटेड ने आपली लोकप्रिय पल्सर Pulsar 150 बाईकची ट्विन-डिस्क अॅडिशनला लॉन्च केली आहे. दिल्लीच्या एक्स शोरुम मध्ये या बाईकची किंमत 78,016 रुपये आहे. या नव्या बाईकमध्ये दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. यामुळे बेक्रिंग परफॉर्मस मध्ये सुधारणा होईल. नवी ट्विन डिस्क अॅडिशन स्पोर्टी स्टाईल नसणार आहे. पल्सर 150च्या सिंगल डिस्क अॅडिशनची विक्री अजून चालू आहे.
'मी प्रेक्षकांना परत एकदा मनोरंजन करेन, पण....'

'मी प्रेक्षकांना परत एकदा मनोरंजन करेन, पण....'

विनोदवीर कपिल शर्मा सध्या त्याच्या कॉमेडी शोसाठी किंवा अफलातून विनोदी शैलीसाठी चर्चेत नसून भलत्याच कारणांनी तो प्रकाशझोतात आला आहे. काही दिवसांपूर्वीच मोठ्या कालावधीनंतर कपिलने ‘फॅमिली टाइम विथ कपिल' या शो घेऊन आला पण हा शो कमाल करु शकला नाही. येत्या काळात माझ्याकडे काही अफलातून प्रोजेक्ट्स येणार आहेत. आपण परत एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करु असे आश्वासन कपिल दिले आहे.