Short News

परत जुलै, ऑगस्टमध्ये बँक  कर्मचाऱ्यांचा संप ?

परत जुलै, ऑगस्टमध्ये बँक कर्मचाऱ्यांचा संप ?

मे महिन्याच्या अखेरीस दोन दिवस संप केल्यानंतरही पगारवाढीबाबत अपेक्षित निर्णय न झाल्याने बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेत अस्वस्थता आहे. पगारवाढीच्या मुद्द्यावर जुलै व ऑगस्टमध्ये हे आंदोलन नव्याने छेडण्यात येईल, असा इशारा द युनायटेड फेडरेशन ऑफ बँक युनियन्सने दिला आहे. देशभरातील नऊ बँक कर्मचारी संघटनांचा महासंघ असणाऱ्या या फेडरेशनचे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी ही माहिती दिली.
वांद्रयात एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन केली आत्महत्या

वांद्रयात एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन केली आत्महत्या

वांद्रे पूर्वेला शासकीय वसाहतीतील एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेश भिंगारे (४५) यांनी पत्नी आणि दोन मुलांसह राहत्या घरी आत्महत्या केली. शासकीय वसाहतीतील इमारत क्रमांक दोनमध्ये ही घटना घडली. गरीबी आणि नैराश्याला कंटाळून या संपूर्ण कुटुंबाने आपले जीवन संपवले. आज सकाळपासून त्यांच्या घरातून कोणीही बाहेर पडले नाही.
प्लास्टिक वापरणाऱ्यांवर राज्यभरात कारवाई

प्लास्टिक वापरणाऱ्यांवर राज्यभरात कारवाई

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यभरात आज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरु आहे. प्लास्टिक वापरणाऱ्याला पाच हजार रुपये दंडाची पावती दिली जात आहे. पुण्यात महापालिकेच्या पथकाकडून सकाळपासून 73 कारवाया करत तीन लाख 69 हजार रुपयांची वसुली केली. सांगलीतही प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानावर महापालिकेने छापे टाकून हजारो रुपयांचा प्लास्टिक आणि थर्माकोलचा साठा हस्तगत करून दंडात्मक कारवाई सुरू केली. 
'यो-यो' पास करणाऱ्यालाच संघात प्रवेश: शास्त्री

'यो-यो' पास करणाऱ्यालाच संघात प्रवेश: शास्त्री

भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी भारतीय संघात निवड होण्यासाठी यो-यो चाचणी अनिवार्य असण्याबद्दल टीका केली असली तरी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा या चाचणीला पूर्ण पाठिंबा आहे. ब्रिटनच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री यांनी या मुद्द्यावर आपले रोखठोक मत व्यक्त केले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more