Short News

त्या विकृताने नकार पचवता न आल्यामुळे मुलीवर गोळी झाडली

त्या विकृताने नकार पचवता न आल्यामुळे मुलीवर गोळी झाडली

आज व्हॅलेंटाईन डे आहे. प्रेमाच्या आणाभाका घेत अनेक प्रेमीयुगुल भविष्याची सुखद स्वप्ने रंगवतात. या दिवशी एका विकृताने नकार पचवता न आल्यामुळे मुलीवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घडली आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील हापूर येथील हुसैनपूर गावात घडली आहे. यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
नोकरदारवर्गाला खूशखबर ; ईपीएफओ ८.६५% व्याजदर कायम ठेवण्याची शक्यता

नोकरदारवर्गाला खूशखबर ; ईपीएफओ ८.६५% व्याजदर कायम ठेवण्याची शक्यता

नोकदारवर्गाला आज एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना सध्याच्या आर्थिक वर्षासाठी ८.६५% व्याजदर कायम ठेवू शकते. या निर्णयामुळे ईपीएफओच्या तब्बल ५ कोटी खातेधारकांना याचा लाभ मिळणार आहे. EPFO ने या आर्थिक वर्षात आपल्या इक्विटी पोर्टफोलिओत चांगला नफा कमावला आहे. आधी व्याजदरात घट झाल्यानंतर ८.५% व्याज देण्यावर विचार सुरु होता.
आज राज ठाकरे अन् शरद पवार यांच्यात रंगणार जुगलबंदी

आज राज ठाकरे अन् शरद पवार यांच्यात रंगणार जुगलबंदी

सगळ्या उत्सुकता लागलेल्या बहुप्रतीक्षित मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत आज होणार आहे. ही मुलाखत पुण्यात होणार असून राज ठाकरे आणि शरद पवार यांची जुगलबंदी रंगणा आहे. पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. 
तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर होणार १३ अंकी

तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर होणार १३ अंकी

भारतात मोबाईल नंबरसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रचलित पद्धतीत बदल लवकरच टेलिकॉम मंत्रालयाकडून मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. त्यामुळेच सध्याचा मोबाईलचा १० अंकाचा नंबर जाऊन त्याजागी १३ अंकी मोबाईल नंबर येणार आहे. टेलिकॉम मंत्रालयाने यासंदर्भात सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर्सना सूचित केले आहे. ८ जानेवारी २०१८ रोजी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला होता.