Short News

भाजपची खेळी, येडियुरप्पांची पहिल्याच दिवशी मोठी घोषणा

भाजपची खेळी, येडियुरप्पांची पहिल्याच दिवशी मोठी घोषणा

कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या भाजपने एक चलाख खेळी करून काँग्रेस-जेडीएसच्या चिंता वाढवल्या आहेत. बी.एस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील १ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे काँग्रेस-जेडीएसच्या काही आमदाराचे चित्त विचलित होऊ शकते, अशी आशा कदाचित भाजपाला वाटते.
फॅफ ड्यू प्लेसिची झुंजार खेळी; चेन्नईचा फायनलमध्ये प्रवेश

फॅफ ड्यू प्लेसिची झुंजार खेळी; चेन्नईचा फायनलमध्ये प्रवेश

चेन्नईच्या फॅफ ड्यू प्लेसिने केलेले 42 चेंडूत 67 धावांच्या जोरावर चेन्नईने हैदराबादचे 140 धावांचे आव्हान 19.1 षटकात पार करत शानदार विजय प्राप्त केला. शेवटच्या षटकांत 6 धावांची गरज असताना फॅफ ड्यू प्लेसिने भुवनेश्वरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत हा सामना संपवला. चेन्नईचे एकीकडे विकेट पडत असताना फॅफ ड्यू प्लेसिने एक बाजू लावून धरली. त्याला शार्दुलने 5 चेंडूत 15 धावा करत चांगली साथ दिली.
स्टेट बँक ऑफ इंडियाला ७,७१८ कोटींचा तोटा

स्टेट बँक ऑफ इंडियाला ७,७१८ कोटींचा तोटा

सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत तब्बल ७,७१८ कोटींचा तोटा झाला आहे. मागील वर्षीच्या अखेरच्या तिमाहीत बँकेनं २,८१५ कोटींच्या नफ्याची नोंद केली होती. थकीत कर्जाच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्यानं हा तोटा वाढला आहे. याआधीच्या तिमाहीत बँकेला २४१६ कोटींचा तोटा झाला होता.
जी. परमेश्वर होणार कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री

जी. परमेश्वर होणार कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी तर उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे जी. परमेश्वर उद्या शपथ घेणार आहेत. कुमारस्वामी यांनी स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार के. आर. रमेश कुमार हे विधानसभा अध्यक्ष असतील. मंगळवारी काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.