Short News

...तर संघप्रमुख एनसजी व पोलीस कमांडोचे संरक्षण कशाला घेतात - मायावती

...तर संघप्रमुख एनसजी व पोलीस कमांडोचे संरक्षण कशाला घेतात - मायावती

राष्ट्रीय स्वंयसेवक संघप्रमुख मोहन भागवत यांनी सैन्याआधी पाकविरोधात लढण्यासाठी संघाचे स्वंयसेवक तयार होतील, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी चांगलाच समाचार घेतला. संघप्रमुख भागवतांना त्यांच्या स्वयंसेवकांबाबत एवढा आत्मविश्वास असेल तर, ते एनसजी व पोलीस कमांडोचे संरक्षण कशाला घेतात, असा त्यांनी सवाल केला.
सिरीयामध्ये लष्कराने केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू

सिरीयामध्ये लष्कराने केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू

सीरियामध्ये सेना आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी २४ तासात केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटेनमधील संघटना 'सीरियन आब्जर्वेटरी फार ह्यूमन राइट्सने म्हटलं की, दमिश्कच्या उपनगरात केलेल्या हवाई हल्ल्यात ३२५ लोकं जखमी झाले. दमिश्क सरकारने म्हटलं की, हल्ला फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करुन करण्यात आला.
विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांचे भाऊ प्रमोद गोएंका यांचं आफ्रिकन देश मोझॅम्बिकमधून अपहरण झाल्याची माहिती आहे. शनिवारपासून प्रमोद गोएंका बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. प्रमोद काही वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायातून बाहेर पडले होते. त्यांनी स्वतःचा दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे.
सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

पीएनबी घोटाळ्यानंतर गडगडलेल्या शेअर बाजार मंगळवारी सावरलेला दिसला. आज सकाळच्या सत्रात सेंसेक्समध्ये 150 अंकाची तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीमध्ये 40 अंकाची वाढ झाली आहे. सध्या सेंसेक्स 33926.57 वर व्यवहार करत असून निफ्टी मध्ये 10417.35 अंकाची वाढ आहे. तरीही बँकेचे शेअर खाली येत आहे.