Short News

राज्याचे महत्त्वाच्या ११ प्रकल्पकांना केंद्राकडून मंजूर

राज्याचे महत्त्वाच्या ११ प्रकल्पकांना केंद्राकडून मंजूर

नरेंद्र मोदी सरकारने ३ वर्षांत महाराष्ट्रातील ११ महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. केंद्रीय पर्यावरण व वन खात्याने वर्षानुवर्षे हिरवा कंदील न दिल्याने हे प्रकल्प रखडले होते. या प्रकल्पांना प्रत्येकी ५ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. देशात रस्तेबांधणी, रेल्वे,पोलाद,ऊर्जा, कोळसा, नदीखोरे, पायाभूत सुविधा या क्षेत्रांशी संबंधित ६८ महत्त्वाच्या प्रकल्प आहेत.
ईपीएफओकडून नोकरदारांना झटका

ईपीएफओकडून नोकरदारांना झटका

देशातील नोकरदारांना झटका देणारे एक वृत्त असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०१७-१८ साठीच्या व्याजदरात कपात केली आहे. गेल्या वर्षी हा व्याजदर ८.६५ टक्के इतका होता तो आता ८.५५ टक्के इतका असणार आहे. ईपीएफओच्या केंद्रीय बोर्डाच्या ट्रस्टींच्या सभेत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्मचारी वर्गात मात्र नाराजी पसरली आहे.
धोनी - पांड्याची शानदार खेळी; भारताचे आफ्रिकेसमोर 189 धावांचे आव्हान

धोनी - पांड्याची शानदार खेळी; भारताचे आफ्रिकेसमोर 189 धावांचे आव्हान

मनिष पांडेने 48 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकाराच्या मदतीने केलेल्या 79 धावा आणि धोनीने 28 चेंडूत तीन षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने केलेल्या 52 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 188 धावा केल्या. आज खूप दिवसानी धोनीची बॅट मैदानावर तळपलेली पहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेकडून ज्यूनीयर डालाने सर्वाधीक दोन विकेट घेतल्या.
अॅक्शनपॅक 'बागी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/F2lN25IayH8" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen></iframe>

अॅक्शनपॅक 'बागी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानीचा अॅक्शनपॅक 'बागी 2' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ हा पुन्हा एकदा एक जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान हा करणार आहे. 30 मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे.