Short News

केंद्रीय निधीसाठी 'एनडीए'ला इशारा देणारे चंद्राबाबू नायडू सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री

केंद्रीय निधीसाठी 'एनडीए'ला इशारा देणारे चंद्राबाबू नायडू सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडे सध्या असलेल्या संपत्तीची एकुण किंमत १७७ कोटी रूपये इतकी आहे.देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्राशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करुन असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे.
अल्टो कार उतरली ग्राहकांच्या पंसतीस,  कार विक्री वाढली

अल्टो कार उतरली ग्राहकांच्या पंसतीस, कार विक्री वाढली

देशात मारुती आल्टो सर्वात जास्त कार विक्री होणारी कार बनली आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या 10 प्रवाशी कारच्या यादीत 7 मॉडेल मारुती कंपनीचे आहेत. तर हुंदाई कंपनीचे तीन मॉडेल आहेत. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम),ऑटोमोबाईल उत्पादक समूहाने शुक्रवारी ही यादी प्रसिद्ध केली आहे. यात मारुतीची कार विक्री यावर्षी 6.99 टक्क्यांनी वाढली आहे. 
उत्तर कोरियात 40 वर्षांनी हुकूमशहाची पत्नी फर्स्ट लेडी घोषित

उत्तर कोरियात 40 वर्षांनी हुकूमशहाची पत्नी फर्स्ट लेडी घोषित

अमेरिकेशी चर्चेसाठी तयार झालेल्या उत्तर कोरियामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. गुरुवारी हुकूमशहा किम जोंग ऊनने आपली पत्नी री सोल जू यांना फर्स्ट लेडी घोषित केले. उत्तरकोरियात 40 वर्षांनंतर हा सन्मान झालेला पाहायला मिळाला.  पत्नीचे स्टेटस वाढवण्यामागे किमचा उद्देश अमेरिकी राष्ट्राध्यक्षासोबत होणारी शिखर वार्ता आहे.  
'पानीपत'साठी उभारला जातोय हुबेहूब शनिवारवाडा

'पानीपत'साठी उभारला जातोय हुबेहूब शनिवारवाडा

सिनेदिग्दर्शक, निर्माता आशुतोश गोवारीकर आपली स्टाइल कायम राखत 'पानीपत' नावाचा चित्रपट बनवत आहे. त्यासाठी आशुतोष भव्य असा शनिवारवाडा जसाच्या तसा उभारणार आहे. आशुतोषने हुबेहूब शनिवारवाडा उभारण्याची संपूर्ण जबाबदारी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर सोपवली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शनिवारवाडा उभारणीच्या कामाला सुरुवातही करण्यात आली.