Short News

भाजपा नेत्याचा शेतकऱ्यांना अजब सल्ला

भाजपा नेत्याचा शेतकऱ्यांना अजब सल्ला

भाजपाच्या आमदारानं नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यानां हनुमान चालिसा वाचण्याचा अजब सल्ला दिला आहे. मध्य प्रदेशमधील भाजपाच्या नेत्याने हा अजब सल्ला दिला आहे. अवकाळी पाऊस किंवा गारपिटीच्या समस्यांसह कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करायचा असेल तर शेतकऱ्यांना हनुमान चालिसा वाचणे हाच एकमेव मार्ग आहे. असा सल्ला भाजपाचे नेते रमेश सक्सेना यांनी दिला आहे.
आगामी आर्थिक वर्षात आठ सरकारी कंपन्याचे आयपीओ

आगामी आर्थिक वर्षात आठ सरकारी कंपन्याचे आयपीओ

एक एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आगामी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ८ सरकारी कंपन्या आयपीओच्या माध्यमातून भांडवली बाजारात प्रवेश करणार आहेत. त्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) व राइट्स लिमिटेडही सहभागी आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या कंपन्या योग्यवेळी भांडवली बाजारात प्रवेश करतील. हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स आयपीओ आणण्यासाठी बाजार नियामक सेबीची अगोदरच मंजुरी आहे. 
मालदीवमधील आणीबाणीला मुदतवाढ द्या - राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन

मालदीवमधील आणीबाणीला मुदतवाढ द्या - राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन

मालदीवचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी देशात लागू असलेल्या आणीबाणीला १५ दिवसांची वाढीव मुदत मिळावी, अशी आज संसदेला विनंती केली आहे. देशात राजकीय अराजक असल्यामुळे ही मुदत वाढावी, असे अब्दुल्ला यामीन यांनी म्हटले आहे. मालदीवच्या संसदेमध्ये बोलाविण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या विनंतीवर चर्चा करण्यात आली. 
शेअर बाजार गडगला;  सेन्सेक्स २३६ अंकांनी तर निफ्टी ७४ अंकांनी घसरला

शेअर बाजार गडगला; सेन्सेक्स २३६ अंकांनी तर निफ्टी ७४ अंकांनी घसरला

 सोमवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २३६ अंकांनी घटत ३३, ७७४ वर आला. तर निफ्टी ७४ अंकांनी उतरत १०,३७८ वर व्यवहार बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये मिडकॅपमध्ये १.०७ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅपमध्ये १.४२ टक्यांनी घट झालेली दिसली. बीएसईमधील सर्व १९ सेक्टरच्या शेअर्स घसरण झालेली दिसली.