Short News

काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर म्हणतात,  'आय लव्ह पाकिस्तान'

काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर म्हणतात, 'आय लव्ह पाकिस्तान'

भारत आणि पाकिस्तान हे देश सख्खे शेजारी आहेत. त्यामुळे मी भारताइतकेच प्रेम पाकिस्तानवरही करतो, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे. अय्यर यांच्या या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीही अय्यर यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेसला अडचणीत आणले होते.
अभिनेता इरफान खानला काविळने झपाटले

अभिनेता इरफान खानला काविळने झपाटले

अभिनेता इरफान खान सध्या काविळने त्रस्त झाला आहे. त्याच्या या आजारामुळेच त्याच्या सिनेमांचे चित्रीकरणही थांबवण्यात आले आहे. इरफानला द मिनस्ट्री या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी पंजाबला जायचे होते. या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर लगेच तो ब्लॅकमेल या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनला सुरूवात करणार होता. पण आता काविळ झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे.
जोगेश्वरीत केमिकल कंपनीला भीषण आग

जोगेश्वरीत केमिकल कंपनीला भीषण आग

जोगेश्वरी येथील धील ईशांत कंपाऊंडमधील एशियन केमिकल कंपनीला गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थ असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु आहे.
जळगावात मानसिक तणावातून विवाहित तरुणाची आत्महत्या

जळगावात मानसिक तणावातून विवाहित तरुणाची आत्महत्या

मानसिक तणावामुळे एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात शहरात घडली. संदीप उत्तम राजपूत (२५) असे या तरुणाचे नाव आहे. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी येथील डोळ्यांच्या धर्मार्थ दवाखाना येथे असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. संदीप हा बुधवार पासून बेपत्ता होता. आज सकाळी त्याचा मृतदेह विहिरीत तंरगताना दिसला.