Short News

येडियुरप्पांच्या शपथविधीविरोधात काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन

येडियुरप्पांच्या शपथविधीविरोधात काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन

कर्नाटकात भाजपचे नेते येडियुरप्पा यांनी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलरच्या नेत्यांकडून विधिमंडळाच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्रिशंकू विधानसभा असलेल्या कर्नाटकात बुधवारी रात्री राज्यपाल वजूभाई वाला यांना अखेर भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. याविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
पाकिस्तान गोळीबारात आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

पाकिस्तान गोळीबारात आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमधील सीरी कालाय गावात ही दुर्देवी घटना घडली. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. सोमवारी रात्रभर आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.
अमित शहांचे लक्ष्य आता पुडुच्चेरी

अमित शहांचे लक्ष्य आता पुडुच्चेरी

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आता पुडुच्चेरीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. तेथील काँग्रेसचे सरकार त्यांना खाली खेचायचे आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाह जुलैमध्ये पुडुच्चेरीला जाणार आहेत. तेथील काँग्रेसचे व्ही. नारायणस्वामी यांचे सरकार क्षीण बहुमतावर उभे असून, ते पडावे, असे ते गेले पाहिजे, असे शहा यांचे प्रयत्न आहेत. तेथील ३० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे १५ आमदार आहे.
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक हेमू अधिकारी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक हेमू अधिकारी यांचं निधन

ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते डॉ. हेमू अधिकारी याचं दीर्घ आजारानं निधन झालं. मुंबईत शिवाजी पार्कमधील राहत्या घरी वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर होता. वजूद, लगे रहो मुन्नाभाई, डिटेक्टिव्ह नानी यासारखे चित्रपट आणि संध्याछाया, ढोलताशे, हसवा फसवी यासारख्या नाटकांमध्ये अधिकारी यांनी काम केलं आहे.