Short News

पक्षाचे दोषी नेते निवडणुकीत उमेदवार निवडू शकतात - सर्वोच्च न्यायालय

पक्षाचे दोषी नेते निवडणुकीत उमेदवार निवडू शकतात - सर्वोच्च न्यायालय

जर गुन्ह्यात दोषी ठरलेली व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. तर पक्षाचे दोषी नेते निवडणुकीत उमेदवार कसे निवडू शकतात, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी विचारला आहे. तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना निवडणुका लढवण्यावर बंदी घालावी अशी शिफारस निवडणूक आयोगाने केली आहे. गुन्हेगारीपार्श्वभूमी असलेल्या नेत्यांविरोधात अश्विनी उपाध्याय यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको' टीआरपीमध्ये एक नंबर

'माझ्या नवऱ्याची बायको' टीआरपीमध्ये एक नंबर

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत दिवसेंदिवस वेगवेगळी वळणे येत आहेत. राधिका सुभेदारचा बदललेला लूक तिचा बदललेला अॅटिट्यूड मुळे मालिकेने वेगळेच वळण घेतले आहे. राधिकाच्या बदललेल्या स्वभावामुळे ती गुरुला कशी टक्कर देणार. याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळेच की काय ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे. वर्षभरापासून ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे. 
16 मे ला होंडा अमेझ कारची लाँन्चिंग, मारुती डिझाअरशी होणार स्पर्धा

16 मे ला होंडा अमेझ कारची लाँन्चिंग, मारुती डिझाअरशी होणार स्पर्धा

होंडा कार्स इंडिआ सेकेंड जेनेरेशन अमेझला 16 मेला लॉन्च करणार आहे. नवी होंडा अमेझने 2018 इंडियन ऑटो एक्सपो मध्ये सादर करण्यात आले आहे. होंडाने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून बुकिंग सुरु केली होती. परंतु भारतात सुझुकी डिझायरशी या कारची स्पर्धा होणार आहे. यासह हुंदाई एक्सेंट, टाटा टिगोर, जेस्ट, फॉक्सवॅागन एमिओ, कॉम्पॅक्ट सिडेनशी स्पर्धा असरणार आहे. या कारचा मॉडेल आधीपेक्षा अधिक सुरेख आहे. 
होंडा बाजारात उतवणार मंकी बाईकी, 'ही' आहेत  फिचर्स

होंडा बाजारात उतवणार मंकी बाईकी, 'ही' आहेत फिचर्स

मागणी कमी असल्याने आणि अॅमिशनच्या नियमात येत नसल्याने होंडा कंपनीने मंकी मोटारसायकलची निर्मिती बंद केली होती. कंपनीने परत आता या बाईक्सची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. 2017 मध्ये टोकियोमध्ये ही बाईक सादर करण्यात आली होती. भारतात या बाईकची किंमत 7 ते 10 लाख रुपये असणार आहे. या बाईकमध्ये होंडा 125 सीसीचे इंजिन ठेवणार आहे.