Short News

वरूण गांधी, मुतालिक यांच्या हत्येचा कट उघड

वरूण गांधी, मुतालिक यांच्या हत्येचा कट उघड

भाजपचे नेते, खासदार वरूण गांधी आणि श्रीराम सेनेचा प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शार्प शूटर राशीद मालबारी याला अबू धाबीमधून अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या कबुलीतून हा खळबळजनक खुलासा झाला आहे. गँगस्टर छोटा शकीलच्या सांगण्यावरून वरूण गांधी आणि प्रमोद मुतालिक यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, अशी कबुली राशीदने दिली आहे. 
सरकारकडून दूध दरवाढीला मंजूरी; आंदोलन यशस्वी

सरकारकडून दूध दरवाढीला मंजूरी; आंदोलन यशस्वी

राज्य सरकारने गुरुवारी दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य केल्या. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत दूध संघाच्या संचालकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारने दुधाचे दर पाच रुपयांनी वाढवून देण्याची प्रमुख मागणी राज्य सरकारने मान्य केली. येत्या 21 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
व्यावसायिक वाहतूकदार आजपासून जाणार संपावर

व्यावसायिक वाहतूकदार आजपासून जाणार संपावर

वाहतूकदारांच्या उद्या, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या बेमुदत देशव्यापी संपात राज्यातील 13 लाखांहून अधिक व्यावसायिक वाहने सहभागी होत असून, त्यात ट्रक, खासगी बसेस, टँकर व टेम्पो यांचा समावेश असेल. संपात राज्यातील 10 लाख ट्रकमालक सहभागी होणार आहेत. दीड लाख टेम्पोमालकही संपात सहभागी होत आहेत. टँकरमालकांनीही संपाला पाठिंबा दिल्याने दूध, पेट्रोल-डिझेल पुरवठ्यावर परिणाम होईल.
प्रसिद्ध गीतकार आणि कवी गोपालदास नीरज यांचं निधन

प्रसिद्ध गीतकार आणि कवी गोपालदास नीरज यांचं निधन

प्रसिद्ध गीतकार आणि कवी गोपालदास नीरज यांचं गुरूवारी संध्याकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निरज यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहीट गाणी दिली. 1991 मध्ये पद्मश्री आणि 2007 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना तीन वेळेस फिल्म फेअर अवार्डनेही सन्मानित करण्यात आलं होतं.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more