Short News

सुंजवाँ कॅम्पवरील हल्ल्याचा मसूद अजहर मास्टरमाईंड : निर्मला सितारमन

सुंजवाँ कॅम्पवरील हल्ल्याचा मसूद अजहर मास्टरमाईंड : निर्मला सितारमन

जम्मूतल्या सुंजवाँ कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्यापाठीमागे जैश-ए-मोहम्मदाचा म्होरक्या मसूद अजहरचा हात असल्याचं संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांनी म्हटलं. जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. "दहशतवाद्यांकडील सामान आणि कागदपत्रं जप्त करण्यात आली. या सर्व कागदपत्रातून या हल्ल्यापाठिमागे पाकिस्तान आणि जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचं स्पष्ट होत आहे असेही त्या म्हणाल्या.
ताजमहालबाबतीत केंद्र सरकारचे न्यायालयात स्पष्टीकरण

ताजमहालबाबतीत केंद्र सरकारचे न्यायालयात स्पष्टीकरण

ताजमहाल हे तेजोमहाल नामक मंदिर असल्याच्या याचिकेला सरकारच्या वतीने उत्तर देताना आज येथील दिवाणी न्यायालयात सरकारने ताजमहालाविषयी पुरातत्व विभागाच्या हवाल्याने उत्तर देताना ताजमहाल शिवालय नसल्याचा दावा केला. या ठिकाणी शिवालयाचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले.
पहा मद्यपानामुळे शरीरावर कोणते वाईट परिणाम होतात

पहा मद्यपानामुळे शरीरावर कोणते वाईट परिणाम होतात

मद्यपानामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात, यात मेंदूवर सर्वात जास्त परिणाम होतो, शांत झोप येत नाही. डायरिया तसेच छातीत जळजळीचे प्रमाण वाढते, स्वादूपिंडावर परिणाम होतो. सातत्याने लघवीला जाण्याचे प्रमाण वाढते. मद्यसेवनाच्या अवघ्या तीस सेकंदामध्ये यामधील घटक मेंदूपर्यंत पोहोचतात. यामुळे व्यक्तीचा मूड बदलू शकतो तसंच मेंदूचं संतुलनंही बिघडू शकतं.
अहमदनगर महापालिकेने स्वीकारला छिंदम यांचा राजीनामा

अहमदनगर महापालिकेने स्वीकारला छिंदम यांचा राजीनामा

श्रीपाद छिंदम याचा उपमहापौरपदाचा राजीनामा अहमदनगर महापालिकेच्या महापौर सुरेखा कदम यांनी मंजूर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या छिंदम याला यापूर्वीच भाजपमधून बडतर्फ करण्यात आले आहे. उपमहापौरपदानंतर त्याचे नगरसेवक पदही रद्द करावे, अशी मागणी जोर धरत आहे. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द वापरले असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.