Short News

७.४० लाख अॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी

७.४० लाख अॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी

संरक्षण मंत्रालयाने ७.४० लाख अॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. लष्कर, नौदल आणि वायुसेना यातील सैनिकांसाठी या रायफल्स खरेदी केल्या जाणार आहेत. या संदर्भातल्या प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली. या रायफल्सची किंमत १२,२८० कोटी इतकी असल्याचे संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. संरक्षण विभागाची एक बैठक संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
व्हॉट्सअॅपच्या मेसेज डिलेट करताना सावधानता बाळगा

व्हॉट्सअॅपच्या मेसेज डिलेट करताना सावधानता बाळगा

व्हॉट्सअॅपचे 'Delete For Everyone' या फीचरबाबत नवी माहिती समोर आली आहे. कीच्या व्यक्तीला मेसेज गेल्यानंतर सात मिनिटांच्या आत तो डिलीट करता येतो. अशा मेसेजच्या जागी डिलीटेड मेसेज असे दिसते. परंतु तुम्ही मेसेज डिलीट करण्यापूर्वी एखाद्या युझरने त्याला कोट करुन रिप्लाय दिलेला असेल तर तो दिसत राहिल.
गुलाबजामचे वेगवेगळे प्रकार पाहून अभिनेता सिद्धार्थ भारावला

गुलाबजामचे वेगवेगळे प्रकार पाहून अभिनेता सिद्धार्थ भारावला

मराठी चित्रपट गुलाबजाम चित्रपटाच्या प्रमोशनात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी व्यस्त आहेत. या दरम्यान त्यांनी आयटीएम इन्स्टिटयूट मध्ये एलिमेंट २०१८ या खाद्यस्पर्धेवेळी हजेरी लावली. "गुलाबजाम" याच संकल्पनेअंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात हॉटेल मॅनेजमेंट शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी पण ७५ पेक्षा जास्त वेगवेगळ्या चवीचे गुलाबजाम तयार केले. 
प्रेक्षकांच्या भेटीला स्वप्नील आणतोय 'मी पण सचिन'

प्रेक्षकांच्या भेटीला स्वप्नील आणतोय 'मी पण सचिन'

क्रिकेट खेळाला धर्म मानणाऱ्या भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर आदर्श व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी सचिनला आदर्श ठेवत मैदानात रणशिंग फुंकले आहे.अशा या सर्व होतकरू तरुणांचे नेतृत्व करणारा सिनेमा लवकरच मराठीच्या मोठ्या पडद्यावर येत आहे.'मी पण सचिन' असे या सिनेमाचे नाव आहे.या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर फर्स्ट लुक रिलीज केला. स्वप्नील जोशीने यात प्रमुख भुमिका साकारली आहे.