Short News

कोणत्याही हिंसेला विकास हेच उत्तर- मोदी

कोणत्याही हिंसेला विकास हेच उत्तर- मोदी

कोणत्याही प्रकारच्या हिंसेला विकास हेच उत्तर असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगडमध्ये केलं. यावेळी त्यांनी राज्यातील नक्षलवादाविषयी चिंता व्यक्त केली. नक्षलवाद हा विकासानंच दूर होऊ शकतो, असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला. मोदी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून त्यांच्याकडून विविध प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येत आहे.
दिल्लीत सापडल्या मुघलकालिन सोन्याच्या पेंटिंग्ज

दिल्लीत सापडल्या मुघलकालिन सोन्याच्या पेंटिंग्ज

दिल्लीतील ऐतिहासिक हुमायू मकबऱ्याजवळील सब्ज बुर्जमध्ये एका अनोख्या खजान्याचा शोध लागला आहे. या बुर्जच्या घुमटामध्ये 16 व्या शतकातील अत्यंत दुर्मिळ पेंटिंग्ज सापडल्या आहेत. त्यात लाल, पिवळ्या आणि सफेद रंगाच्या पेंटिंग्जचा समावेश आहे. आश्चर्य म्हणजे संशोधकांना या घुमटामध्ये अनेक सोन्याच्या पेंटिंग्ज सापडल्या आहेत. आगा खान ट्रस्ट फॉर आर्कलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने त्याबाबतची माहिती दिली. 
Football Worldcup : एका गोलाच्या जोरावर पोर्तुगालचा पहिला विजय

Football Worldcup : एका गोलाच्या जोरावर पोर्तुगालचा पहिला विजय

ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर पोर्तुगालने मोरॅक्कोवर 1-0 असा विजय मिळवला. यंदाच्या फुटबॉल विश्वचषकातील पोर्तुगालचा हा पहिला विजय ठरला. कारण पहिल्या सामन्यात पोर्तुगालने स्पेनबरोबर 3-3 अशी बरोबरी साधील होती. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला पोर्तुगालला पेनेल्टी कॉर्नर मिळाला. या कॉर्नरवर अप्रतिम हेडर लगावत रोनाल्डोने संघासाठी पहिल्या सत्रातील एकमेव गोल केला. 
स्वातंत्रदिनी येतोय जॉनचा 'सत्यमेव जयते' सिनेमा

स्वातंत्रदिनी येतोय जॉनचा 'सत्यमेव जयते' सिनेमा

जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला ‘सत्यमेव जयते' हा नवा लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला येत आहे. जॉनच्या या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. मिलाप मिलान झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते' हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. "या स्वातंत्र्यदिनी, न्याय मिळणार," असे म्हणत चित्रपटाचे पहिले पोस्टर जॉनने ट्विटवर शेअर केले आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more