Short News

मोदी आणि इमॅन्युअल यांच्या बॅनर्समागे लपवल्या ड्रेनेज लाईन्स

मोदी आणि इमॅन्युअल यांच्या बॅनर्समागे लपवल्या ड्रेनेज लाईन्स

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन पत्नी ब्रीगीट यांच्यासोबत सध्या भारत दौऱ्यावर आलेत. काल नरेंद्र मोदी आणि इमॅन्युअल यांनी वाराणसीमध्ये बोटीमधून गंगा घाटावर फेरफटका मारला. मात्र आता परदेशी राष्ट्रपतींसमोर उभारण्यात आलेल्या खोट्या गंगा घाटाचे चित्र नेटकऱ्यांनी समोर आणले आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी गंगेच्या पात्रात वाहून आणणाऱ्या मोठ्या नाल्यांसमोर तसेच पाईपलाईन्ससमोर चक्क पोस्टर उभे केले.
व्यावसायिकाविरोधात अभिनेत्री झीनत अमान यांची बलात्काराची तक्रार

व्यावसायिकाविरोधात अभिनेत्री झीनत अमान यांची बलात्काराची तक्रार

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईतील एका व्यावयायिकाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. जुहू पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री अटकही करण्यात आली आहे. झीनत अमान यांच्या तक्रारीनंतर क्राईम ब्रँचने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. काल गुरुवारी रात्री मोहम्मद सरफराज नावाच्या व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे.
मंत्रालयाच्या गेटवर पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्रालयाच्या गेटवर पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्रालयाच्या गेटवर पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न झाला आहे. गुलाब शिंगारे नावाच्या एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्महदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. ५६ वर्षीय गुलाब शिंगारे यांना वेळीच पोलिसांनी रोखल्यामुळे अनर्थ टळला. गुलाब शिंगारे शेतकरी असल्याची माहिती आहे. दरम्यान मरिन ड्राईव्ह पोलिसांनी गुलाब शिंगारेंना ताब्यात घेतलं आहे.
चाहत्याने काढला रणवीरचा नग्नावस्थेतील व्हिडिओ आणि...

चाहत्याने काढला रणवीरचा नग्नावस्थेतील व्हिडिओ आणि...

रणवीर सिंगने आपला एक मजेशीर किस्सा सांगितला, तो म्हणाला की, ‘मी स्विमिंग पूलजवळ होतो आणि त्याचवेळी एका चाहत्याने माझा नग्नावस्थेतील व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ जर व्हायरल झाला असता तर मला खूप त्रास सहन करावा लागला असता. सुदैवाने त्याच्या कॅमेऱ्याचा लाइट चालू असल्याने मला लगेच कळले. त्याला पकडण्यात मला यश मिळालं आणि त्याने शूट केलेला व्हिडिओ मी डिलीट करुन घेतला.'