Short News

अर्थमंत्री अरुण जेटलींनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ

अर्थमंत्री अरुण जेटलींनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी राज्यसभेच्या पुढील कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या चेंबरमध्ये त्यांनी शपथ घेतली. 65 वर्षांच्या जेटलींना उत्तर प्रदेशमधून राज्यसभेसाठी पाठवण्यात आले आहे. पण प्रकृती खराब असल्याने त्यांना शपथ घेता आली नव्हती. किडनीवर उपचार सुरू असल्याने त्यांच्या शपथ ग्रहणासाठी आज विशेष व्यवस्था करण्यात आली होती. 
अल्टो कार उतरली ग्राहकांच्या पंसतीस,  कार विक्री वाढली

अल्टो कार उतरली ग्राहकांच्या पंसतीस, कार विक्री वाढली

देशात मारुती आल्टो सर्वात जास्त कार विक्री होणारी कार बनली आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या 10 प्रवाशी कारच्या यादीत 7 मॉडेल मारुती कंपनीचे आहेत. तर हुंदाई कंपनीचे तीन मॉडेल आहेत. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम),ऑटोमोबाईल उत्पादक समूहाने शुक्रवारी ही यादी प्रसिद्ध केली आहे. यात मारुतीची कार विक्री यावर्षी 6.99 टक्क्यांनी वाढली आहे. 
उत्तर कोरियात 40 वर्षांनी हुकूमशहाची पत्नी फर्स्ट लेडी घोषित

उत्तर कोरियात 40 वर्षांनी हुकूमशहाची पत्नी फर्स्ट लेडी घोषित

अमेरिकेशी चर्चेसाठी तयार झालेल्या उत्तर कोरियामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. गुरुवारी हुकूमशहा किम जोंग ऊनने आपली पत्नी री सोल जू यांना फर्स्ट लेडी घोषित केले. उत्तरकोरियात 40 वर्षांनंतर हा सन्मान झालेला पाहायला मिळाला.  पत्नीचे स्टेटस वाढवण्यामागे किमचा उद्देश अमेरिकी राष्ट्राध्यक्षासोबत होणारी शिखर वार्ता आहे.  
'पानीपत'साठी उभारला जातोय हुबेहूब शनिवारवाडा

'पानीपत'साठी उभारला जातोय हुबेहूब शनिवारवाडा

सिनेदिग्दर्शक, निर्माता आशुतोश गोवारीकर आपली स्टाइल कायम राखत 'पानीपत' नावाचा चित्रपट बनवत आहे. त्यासाठी आशुतोष भव्य असा शनिवारवाडा जसाच्या तसा उभारणार आहे. आशुतोषने हुबेहूब शनिवारवाडा उभारण्याची संपूर्ण जबाबदारी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर सोपवली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शनिवारवाडा उभारणीच्या कामाला सुरुवातही करण्यात आली.