Short News

काँग्रेस कर्नाटकचा बदला घेणार गोव्यात

काँग्रेस कर्नाटकचा बदला घेणार गोव्यात

कर्नाटकचा बदला गोव्यात घेण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. गोव्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. जो न्याय कर्नाटकला लावला तोच गोव्यात लावण्याची मागणी काँग्रेस करणार आहे. गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी चेल्ला कुमार आज गोव्याला दाखल होणार असून ते आणि पक्षाचे इतर नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. काँग्रेसला सत्ता स्थापन्यसाठी आमंत्रण द्यावे अशी मागणी करतील.
ईस्त्राईलची अवघ्या १२ मिनिटांत राखरांगोळी करू: पाकिस्तानची फुशारकी

ईस्त्राईलची अवघ्या १२ मिनिटांत राखरांगोळी करू: पाकिस्तानची फुशारकी

पाकिस्तानच्या एका वरिष्ठ आर्मी कमांडरने दावा केला आहे की, त्यांचा पाकिस्तान इस्त्राईलची केवळ १२ मिनिटांत राखरांगोळी करू शकतो. जॉईंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे चेअरमन जनरल जुबेर महमूद हयात यांनी हे विधान केले आहे. हयात म्हणतात की, इस्त्राईलने आमच्या भूभागावर आक्रमण करण्याचा केवळ प्रयत्न जरी केला तर, आम्ही केवळ १२ मिनिटांत यहूदींच्या राजवट केवळ १२ मिनिटात राखरांगोळी करू.
रवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलीस कॉन्स्टेबलकडून मारहाण

रवींद्र जडेजाच्या पत्नीला पोलीस कॉन्स्टेबलकडून मारहाण

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीवर एका पोलीस कॉन्स्टेबलने हल्ला केला. गुजरातच्या जामनगरमध्ये शारु सेक्सशन रोडवर सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. छोटयाशा अपघातानंतर संतप्त झालेल्या या पोलीस कॉन्स्टेबलने जडेजाची पत्नी रिवा सोळंकीला थेट मारहाण केली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. संजय अहीर असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे.
22 मे 2018 : मुंबईत पेट्रोल 30 पैसे तर डिझेल 26 पैशांनी महाग

22 मे 2018 : मुंबईत पेट्रोल 30 पैसे तर डिझेल 26 पैशांनी महाग

मागील दोन-तीन आठवड्यापासून स्थिर असलेले इंधनाचे दर वाढू लागले आहेत. आज मुंबईत पेट्रोलच्या दरात 33 पैशांनी वाढ झाली, तर डिझेलमध्ये 26 पैशांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीतही इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे. मुंबईत पेट्रोल 84.70 रु.प्रतिलिटर. तर डिझेल 72.48 रु. प्रतिलिटर आहे. दिल्लीत पेट्रोल 76.87 रु.प्रतिलिटर तर डिझेल 68.08 रु. प्रतिलिटर आहे.