Short News

आता लग्नाच्या खर्चाचा हिशोब मागणार सरकार, हा होईल मोठा फायदा

आता लग्नाच्या खर्चाचा हिशोब मागणार सरकार, हा होईल मोठा फायदा

तुमच्या लग्नाच्या खर्चाचा हिशोब सरकारला द्यावा लागणार आहे. विवाहात होणाऱ्या खर्चाबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विवाह समारंभात होणाऱ्या खर्चाचा हिशेब मिळण्यासंदर्भात केंद्र सरकारने एक नवा कायदा करण्याची गरज आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला यासंदर्भात एक नोटीस पाठवली आहे. या प्रकरणात स्वतःच्या कायदेतज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार मत व्यक्त करण्याचे आदेश दिलेत.
इंग्लंडने जिंकली नाणेफेक; घेतला गोलंदाजीचा निर्णय

इंग्लंडने जिंकली नाणेफेक; घेतला गोलंदाजीचा निर्णय

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वन डे मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहेत. हा सामना लीड्स येथील मैदानात होत आहे. गेल्या लढतीत मधल्या फळीतील फलंदाजांनी पुरक साथ न दिल्याने भारतीय संघाला फटका बसला होता. 
11 वर्षीय बालिकेवर 7 महिन्यांपासून 18 जणांकडून गँगरेप

11 वर्षीय बालिकेवर 7 महिन्यांपासून 18 जणांकडून गँगरेप

चेन्नईच्या अयानवरम परिसरात 11 वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. 18 आरोपी 7 महिन्यांपासून चिमुरडीवर रेप करत होते. गँगरेप करणाऱ्या नराधमांमध्ये अपार्टमेंटमध्ये नोकरीला असलेला सिक्युरिटी गार्ड, लिफ्ट ऑपरेटर, प्लंबर आणि एवढेच नव्हेतर दररोज इमारतीला पाणीपुरवठा करणाराही सामील आहे. गुंगीचे औषध खाऊ घालून बेशुद्ध करायचे, यानंतर चिमुरडीवर बलात्कार केला जात. 
न्यायालयाने नवाज शरीफ, मरियम यांचा जामीन अर्ज फेटाळला

न्यायालयाने नवाज शरीफ, मरियम यांचा जामीन अर्ज फेटाळला

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ते दोहीही अटकेत आहेत. गेल्या आठवड्यात लंडनहून पाकिस्तानात आल्यावर नवाज शरीफ आणि मरियन नवाज यांना लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली. पाकिस्तानातील एएनबीने अटकेची कारवाई केली. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more