आनंदाची बातमी ! यंदा 97 टक्के पाऊस - आयएमडी
भारत
- 8 days ago
स्कायमेटपाठोपाठ भारतीय हवामान विभागाने बळीराजाला शुभ वार्ता दिली आहे. यंदा सरासरी पाऊस राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडेल, असे भाकीत आयएमडीने वर्तवले. भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडी यंदाच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला. हवामान विभागाने पत्रकार परिषद घेऊन पाऊसमान कसा राहिल याबाबतची माहिती दिली. मागील वर्षी 96 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता.