Short News

ऑडिशनमध्ये कपडे उतरवण्याची मागणी

ऑडिशनमध्ये कपडे उतरवण्याची मागणी

बेंगळुरूतील आगामी रिअॅलिटी शोसाठी ऑडिशन सुरू होते. तुझे किती लवर्स आहेत? तुला सेक्सबद्दल माहीत आहे का? तू कधी सेक्स केलयंस का?... उत्तरं द्यायला संकोच वाटेल अशा अनेक अश्लिल प्रश्नांची सरबत्तीच त्यांच्यावर करण्यात आली. तर ऑडिशनच्या पुढच्या राउंडमध्ये जायचे असल्यास अंगावरील सगळे कपडे काढून नग्नावस्थेत समोर असलेल्या पुरुषाला किस करण्यासही सांगण्यात आल्याची धक्कादायक माहिती एका तरुणीनं दिली.
पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, पाहा! असे होते आजचे दर

पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, पाहा! असे होते आजचे दर

पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने घट दिसून येत आहे. रोज होणाऱ्या बदलामुळे पेट्रोलचे भाव ८१ च्या घरात गेले होते. आता पेट्रोल ७९ रुपयांपर्यंत खाली आहे. आज मुंबईत पेट्रोलच्या दरात १९ पैसे आणि डिझल १६ पैसे स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल झाल्याने ही घट दिसून आली आहे. काही दिवसांपुर्वी इंधनाच्या दरात वाढ झाली होती. 
विरानुष्काच्या 'त्या' फोटोला एका तासात मिळाल्या लाखो लाईक्स

विरानुष्काच्या 'त्या' फोटोला एका तासात मिळाल्या लाखो लाईक्स

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माचा एका फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोला तासाभरात १३ लाख लाईक्स मिळाले आहेत. विराट कोहलीने हा फोटो शेअर केला आहे. याशिवाय २५ हजार लोकांनी या फोटोवर कमेंट केली आहे. हा फोटो एक प्रेमी आणि प्रेमिका एकमेकांना घट्ट अलिंगनाचा देत असल्याच्या फोटोसमोर काढण्यात आला आहे. 
ही टेलिकॉम कंपनी होणार बंद

ही टेलिकॉम कंपनी होणार बंद

टेलिकॉम कंपनी एअरसेल दिवाळखोरीच्या स्थितीमध्ये आली आहे. कंपनीनं नॅशनल कंपनी ट्रिब्यूनलकडे दिवाळखोरीसाठी अर्जही दाखल केला आहे. एअरसेल कंपनी बंद झाल्यावर त्यांच्या सगळ्या सर्कलच्या सेवाही बंद होणार आहेत. दिवाळखोरीचा अर्ज देण्याआधीच कंपनीनं त्यांच्या बोर्डला रद्द केलं आहे. दिवाळखोर घोषित झाल्यावर एअरसेल कंपनी म्हणून संपुष्टात येईल.