Short News

'योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदासाठी लायक नाहीत’

'योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदासाठी लायक नाहीत’

योगी आदित्यनाथ हे भारतीय राजकारणाला कलंक आहेत. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसण्यासही ते लायक नाहीत. जर त्यांच्यामध्ये जरा सुद्धा लाज असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,अशी घणाघाती टीका कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी केली. देशभरात सध्या उन्नाव बलात्कार प्रकरणावरून प्रचंड रोष आहे. योगी या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप होत आहे. 
शौचालय नसल्याने ‘या’ राज्यातील सरकारी कर्मचा-यांचे रोखले पगार

शौचालय नसल्याने ‘या’ राज्यातील सरकारी कर्मचा-यांचे रोखले पगार

जम्मू-काश्मिरला हागणदारीमुक्त बनवण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत. घरात शौचालय नसलेल्या राज्य सरकारी कर्मचा-यांविरोधात कठोर पावले उचलताना जम्मू-काश्मिर सरकारने त्यांचे पगार रोखले आहेत. येथील किश्तवार जिल्ह्यात 616 सरकारी कर्मचा-यांचा पगार रोखण्यात आला आहे. एका अधिका-याने शनिवारी याबाबत माहिती दिली.जिल्हा विकास आयुक्त अंग्रेज सिंह राणा यांनी हा आदेश काढला आहे.
फळ नाही तर किमान धोंडे तरी पाडू नका - उद्धव ठाकरे

फळ नाही तर किमान धोंडे तरी पाडू नका - उद्धव ठाकरे

हिंदुत्वाच्या मुद्यावर मागची 25 वर्षे तुमच्यासोबत मित्रत्व असताना तुम्हाला जरा अच्छे दिन काय आले तुम्हाला शिवसेना नकोशी वाटते, याचा आम्हाला त्रास होतो, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘गोफ' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.आमच्या पदरात काही देत नाही किमान धोंडे तरी पाडू नका अशी टीका त्यांनी केली. 
Samsung Galaxy C7 Pro च्या किंमतीत मोठी कपात

Samsung Galaxy C7 Pro च्या किंमतीत मोठी कपात

सॅमसंग गॅलक्सी सी 7 प्रोच्या किंमतीत भारतात 2500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हा फोन 27 हजार 990 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर याची किंमत 24 हजार990 रुपये करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा किंमतीत कपात केल्याने हा फोन आता 22 हजार 400 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.अमेझॉनवर हा फोन नव्या किंमतीसह उपलब्ध आहे. 10हजार रुपयांपर्यंतची एक्स्चेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय उपलब्ध आहे