Short News

करुणानिधींची प्रकृती गंभीर: एमके स्टालिन यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

करुणानिधींची प्रकृती गंभीर: एमके स्टालिन यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम.करुणानिधी यांची प्रकृती ढासळत चालली आहे. शरीरातील महत्वाच्या अवयवांचे कार्य चालू ठेवणे आव्हानात्मक बनत आहे,असे चेन्नईच्या कावेरी हॉस्पिटलकडून सांगण्यात आले आहे. कावेरी रुग्णालयाबाहेर द्रमुकच्या समर्थकांची गर्दीही वाढत आहे. दुपारी द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एमके स्टालिन यांनी कुटुंबियांसह राज्याचे मुख्यमंत्री ई.पलानीस्वामी यांची भेट घेतली. 
लवकरच रुपेरी पडद्यावर येणार जयललिता यांचा जीवनप्रवास

लवकरच रुपेरी पडद्यावर येणार जयललिता यांचा जीवनप्रवास

तामिळनाडूच्या दिवगंत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची लोकप्रियता साऱ्यांनाच ठाऊक आहे. जयललिता यांनी सहा वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची धूरा सांभाळली होती. त्यामुळे सुलभरित्या राजकीय कारकिर्द सांभाळणाऱ्या जयललिता यांचा जीवनप्रवास लवकरच उलगडा जाणार आहे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची लवकरच निर्मिती होणार आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक विजय हा बायोपिकची निर्मिती करणार आहेत. 
गांगुलीच्या बॅटवर अटलजींनी लिहिला होता 'हा'  भावनिक संदेश

गांगुलीच्या बॅटवर अटलजींनी लिहिला होता 'हा' भावनिक संदेश

अटलबिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा भारत आणि पाकिस्तानातील संबंध सुधारण्यावरही त्यांनी भर दिला.त्याचवेळी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होता. दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाने वाजपेयी यांची भेट घेतली होती. त्यावेळी वाजपेयी यांनी भारताचा कर्णधार सौरव गांगुलीला एक बॅट भेट म्हणून दिली. या बॅटवर वाजपेयींनी 'खेल ही नहीं, दिल भी जीतिए। शुभकामनाएं',असा संदेश लिहिला होता. 
त्रिपुराच्या राज्यपालांनी 'त्या' ट्विटबद्दल मागितली माफी

त्रिपुराच्या राज्यपालांनी 'त्या' ट्विटबद्दल मागितली माफी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. त्यांच्यावर दिल्लीतीलएम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरात प्रार्थना सुरू असताना त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांना ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली. मात्र काही वेळातच रॉय यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि मग त्यांनी ट्विट डिलीट करुन माफी मागितली.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more