Short News

बिबट्याने केली सात वर्षाच्या चिमुरड्याची शिकार,  गावकऱ्यांनी जाळले जंगल

बिबट्याने केली सात वर्षाच्या चिमुरड्याची शिकार, गावकऱ्यांनी जाळले जंगल

बिबट्याने सात वर्षाच्या चिमुरड्याची शिकार केल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाच्या 8 एकर जमिनीवर आग लावली. उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यात असलेल्या हरिनागरी गावात ही घटना घडली आहे. बिबट्याने हल्ला केल्याची ही तीन महिन्यातील दुसरी घटना असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी संध्याकाळी चिमुरडा शौचासाठी घराबाहेर गेला होता त्यावेळी बिबट्याने हा हल्ला केला. त्यानंतर गावकऱ्यांनी जंगल जाळले. 
सुबोध भावे काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेत

सुबोध भावे काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेत

बालगंधर्व, लोकमान्य नंतर आता अभिनेता सुबोध भावे आणखी एका चरित्रपटात दिसणार आहे, या चित्रपटाचं नावं आहे 'काशिनाथ घाणेकर'. अभिजीत देशपांडे दिग्दर्शित 'काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट व्हायाकॉम १८ आणि श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सची निर्मिती असणार आहे. पोस्टर वर काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेत सुबोध भावे दिसत आहे. चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सुमीत राघवन यांच्यादेखील प्रमुख भूमिका असतील.
इंग्लंडच्या दौऱ्यात धोनी हा रेकॉर्ड बनवणार

इंग्लंडच्या दौऱ्यात धोनी हा रेकॉर्ड बनवणार

भारताच्या इंग्लंड दौऱ्याला जुलै महिन्यापासून सुरुवात होईल. भारतीय निवड समितीनं टी-20 आणि वनडे सीरिजसाठीच्या टीमची घोषणा केली आहे. महेंद्रसिंग धोनीला वनडे क्रिकेटमध्ये १० हजार रन बनवण्यासाठी आणखी ३३ रनची आवश्यकता आहे. वनडेमध्ये १० हजार रन करणारा धोनी १२ वा खेळाडू ठरेल. १० हजार रन आणि ५० पेक्षा जास्त सरासरी असणारा धोनी हा एकमेव खेळाडू असेल.
बहिणीचं कुटुंब संपवणाऱ्या विवेक पालटकरला बेड्या

बहिणीचं कुटुंब संपवणाऱ्या विवेक पालटकरला बेड्या

नागपुरात तीक्ष्ण हत्याराने कमलाकर पवनकर यांच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या करणारा आरोपी सापडला आहे. कमलाकर पवनकर यांचा बेपत्ता असलेला मेहुणा विवेक पालटकरला नागपूर पोलिसांनी पंजाबमध्ये बेड्या ठोकल्या. विवेकला पंजाबमधील लुधियाना येथून अटक करण्यात आली असून, पोलिसांचं पथक विवेकला घेऊन नागपूरकडे येत आहेत.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more