Short News

लखनौ विद्यापीठात 'व्हॅलेंटाईन डे'मुळे कॅम्पसमध्ये नो एन्ट्री

लखनौ विद्यापीठात 'व्हॅलेंटाईन डे'मुळे कॅम्पसमध्ये नो एन्ट्री

'व्हॅलेंटाईन डे'साठी लखनौ विश्वविद्यापीठाने तुघलकी फतवा जारी केला आहे. 'व्हॅलेंटाईन डे'मुळे बुधवारी विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये येण्यास सक्त मनाई केली. विशेष म्हणजे, विद्यापीठ कॅम्पस परिसरात कोणीही फिरताना दिसल्यास, त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही विद्यापीठ प्रशासनाने दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याला उद्या विद्यापीठात पाठवू नये, अशा सूचना देण्यात आल्यात.  
शिवसैनिकांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा : उद्धव ठाकरे

शिवसैनिकांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा : उद्धव ठाकरे

अहमदनगरमधील शिवसैनिकांचे मारेकरी फासावर लटकायला हवेतच. पण सूत्रधार किंवा सुपारी देणारेही फासावर लटकले पाहिजेत. मग ते सत्ताधारी पक्षाचे का असेना, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी फडणवीस सरकारवर पुन्हा निशाणा साधला.
..अन् इम्रान खानची तिसरी बायकोही गेली सोडून

..अन् इम्रान खानची तिसरी बायकोही गेली सोडून

काही दिवसांपूर्वी आपल्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आलेल्या इम्रान खान यांची पुन्हा एकदा विकेट पडण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांची तिसरी बायकोही त्यांना सोडून गेली असल्याची चर्चा आहे. इम्रान खान यांनी अध्यात्मिक गुरु बुशरा मनेकशी लग्न केल्याचे जाहीर करत सोशल मीडियावर या लग्नाचे फोटोही शेअर केले होते. मात्र पाळीव कुत्र्यांवरुन झालेल्या भांडणामुळे तिसरी पत्नी माहेरी निघून गेल्याचे समजत आहे. 
भारतीय आयटी कंपन्यांच्या एच1बी व्हिसाची मान्यतेत घट

भारतीय आयटी कंपन्यांच्या एच1बी व्हिसाची मान्यतेत घट

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एच1बी व्हिसाच्या नवीन नियमामुळे 2015 ते 2017 या दरम्यान एच1बी व्हिसाच्या अर्जांमध्ये घसरण झाली आहे. या काळात 43 टक्क्यांची घसरण झाल्याची नोंद अमेरिकेच्या थिंक टॅक केली आहे. या व्हिसा धारकांच्या साथीदारांना अमेरिकेत रोजगार मिळणार नसल्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.2017 मध्ये रोजगारासाठी फक्त 8,468 एच-1बी व्हिसाचे अर्ज मिळाले होते. यात 2015 च्या तुलनेत घट होती.