Short News

9 वर्षीय काश्मीरी मुलाचा कारिष्मा; शोधला ‘काऊंटिंग पेन’

9 वर्षीय काश्मीरी मुलाचा कारिष्मा; शोधला ‘काऊंटिंग पेन’

नेहमी हिंसक घटनांमुळे जम्मू-काश्मीर कायमच बातम्यांच्या केंद्रस्थानी असते. याच काश्मीरमधून सकारात्मक बातमी आहे. नऊ वर्षाचा मुलगा काश्मीरच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आशादायी चेहरा बनला आहे. मुझफ्फर अहमद खान असे या मुलाचे नाव आहे. त्याने अनोखं संशोधन केले आहे. नऊ वर्षाच्या मुझफ्फर अहमद खान याने ‘काऊंटिंग पेन' बनवले आहे. या पेनने आपण लिहित गेल्यास, जेवढे शब्द आपण लिहिले आहेत ते कळणार आहे.
रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅनला उडवले, चालकासह 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू

रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅनला उडवले, चालकासह 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅनला ट्रेनने धडक दिली, ज्यामध्ये चालकासह 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. कुशीनगरच्या डिव्हाईन मिशन स्कूलचे विद्यार्थी ज्या स्कूल बसमधून जात होते, ती मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पार करत होती. यावेळी वेगाने आलेल्या पॅसेंजर ट्रेनने स्कूल व्हॅनला उडवले.पोलीस आणि प्रशासनाने माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
प्रियंकाला प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचे आमंत्रण

प्रियंकाला प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचे आमंत्रण

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. लंडनमध्ये 19मे रोजी ते दोघे लग्नाच्या गाठीत अडकणार आहेत. या लग्नाचे आमंत्रण बॉलिवूडमधील देखील एका अभिनेत्रीला आले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून देसी गर्ल प्रियांका चोप्रा आहे.19 मे रोजी होणाऱ्या लग्नाच्या पाहुण्याच्या यादीत प्रियांकाचे नावदेखील सामील आहे. प्रियांका हॉलिवूड अभिनेत्री मेगनची खूप चांगली मैत्रिण आहे. 
पाकिस्तानात लग्नाला नकार दिल्याने मुलीची हत्या

पाकिस्तानात लग्नाला नकार दिल्याने मुलीची हत्या

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ऑनर किलिंगची घटना घडली आहे. 26 वर्षीय एका इटालियन-पाकिस्तानी मुलीची तिच्या घरच्यांनी हत्या केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नातेवाईकासोबत लग्न करण्यास नकार दिल्याने मुलीचा खून करण्य़ात आला. सना चीमा असे या खून झालेल्या मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे पूर्ण परिवाराने अपघात झाल्याची बतावणी केली होती.