Short News

सीमेरेषेवर पाकिस्तानकडून तुफान गोळीबार, BSF जवान जखमी

सीमेरेषेवर पाकिस्तानकडून तुफान गोळीबार, BSF जवान जखमी

पंतप्रधान मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवसाआधी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गुरुवारी तुफान गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा  एक जवान जखमी झाला आहे. रेंजर्सनी बीएसएफच्या डझनभर चौक्यांवर रात्रभर गोळीबार केला. रीगल पोस्टवर तैनात असलेला एक जवान जखमी झाला.
बीएमसी आयुक्त अजॉय मेहता कोर्टात हजर राहा : उच्च न्यायालय

बीएमसी आयुक्त अजॉय मेहता कोर्टात हजर राहा : उच्च न्यायालय

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांना आज (24 मे) कोर्टात हजर राहण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. वारंवार निर्देश देऊनही महापालिका प्रशासन हायकोर्टाच्या सूचनांकडे दुर्लक्ष का करते? असा उद्विग्न सवालही हायकोर्टाने उपस्थित केला आहे. दक्षिण मुंबईतील काळबादेवी परीसरातील भाटिया इमारतीतील रहिवाशांनी इमारतीच्या चार मालकांविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. 
डोनाल्ड ट्रम्प-किम जोंग उन यांच्यातील बैठक रद्द

डोनाल्ड ट्रम्प-किम जोंग उन यांच्यातील बैठक रद्द

उत्तर कोरियाने अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केल्याचे जाहीर केल्यानंतर काही तासातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन बरोबरची १२ जूनला सिंगापूरमध्ये होणारी नियोजित बैठक रद्द केली आहे. जागतिक शांततेच्या दृष्टीकोनातून ही बैठक होणे महत्वाचे होते. मला तुम्हाला भेटण्याची भरपूर इच्छा होती. पण अलीकडची तुमची विधाने बघितली तर त्यामध्ये संताप आणि वैरभावना दिसते. असे अमेरिकेने म्हटले आहे. 
महाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा

महाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला फायदा

सरकारमध्ये एकत्र असूनही भाजपा आणि शिवसेनेमधील दुरावा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांनी युती करून निवडणूक लढवल्यास काँग्रेस आणि भाजपाच्या आघाडीपेक्षा युती पुढे राहील, अशी शक्यता सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more