Short News

PNB घोटाळा :  सीबीआय आरोपपत्रात मेहुल चोक्सीही वॉन्टेड आरोपी

PNB घोटाळा : सीबीआय आरोपपत्रात मेहुल चोक्सीही वॉन्टेड आरोपी

पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यात सीबीआयने आता दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सी याला वॉन्टेड आरोपी म्हणून जाहीर केले आहे. सीबीआयने या घोटाळा प्रकरणात आणखी एक 12 हजार पानी चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये नीरव मोदीपाठोपाठ मेहुल चोक्सीलाही वॉन्टेड म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान याआधी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सोमवारीही आरोपपत्र दाखल केले. 
भाजपकडून माझ्या पतीच्या फोटोंचा गैरवापर, जयश्री वनगा

भाजपकडून माझ्या पतीच्या फोटोंचा गैरवापर, जयश्री वनगा

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या फोटो आणि नावाचा भाजपकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप जयश्री वनगा यांनी केला असून भाजपविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
अन् पालकमंत्र्यांनी आमदारांना ठोकला सलाम

अन् पालकमंत्र्यांनी आमदारांना ठोकला सलाम

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट पुन्हा एकदा आपल्या गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. पिंपरी-चिंचवड येथील आयुक्तालयात आले असता त्यांनी चक्क दोन आमदारांना सलाम ठोकला. त्यांच्या या कृतीमुळे आमदारांसह पोलीस अंचबित झाले. गिरीश बापट हे पिंपरी चिंचवड शहरातील स्वतंत्र आयुक्तालया संदर्भाच्या बैठकीला बापट आले शहरात आले होते. यावेळी त्यांनी बैठकस्थळी येताच आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना सलाम ठोकला. 
टी20 लीग:  मुंबईसमोर दिल्लीचे 175 धावांचे आव्हान

टी20 लीग: मुंबईसमोर दिल्लीचे 175 धावांचे आव्हान

आज मुंबई बाद फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी दिल्लीविरुद्ध लढा देत आहे. . दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत रिषभ पंत आणि विजय शंकरने दमदार खेळी केली आहे. पंतने आपले अर्धशतक केले. तर शंकरने 43 धावा केल्या. दिल्लीने निर्धारित 20 षटकात 174 धावा 4 गडी बदल्यात केल्या आहेत. मुंबईसमोर 175 धावांचे आव्हान दिले आहे.