Short News

महिला पत्रकाराला पोलीस उपनिरीक्षकाने मारली मिठी

महिला पत्रकाराला पोलीस उपनिरीक्षकाने मारली मिठी

पासपोर्ट नूतनीकरण पडताळणीसाठी आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने एका महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याची घटना गाझियबादमध्ये घडली. पीडित पत्रकार महिला गाझियबादमध्ये राहते. देवेंदर सिंह असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून याने आपल्याबरोबर अश्लील कृती करुन जबरदस्तीने मिठी मारली असा आरोप या पत्रकाराने केला आहे. महिला पत्रकाराने एका पाठोपाठ एक टि्वट करुन आरोप केले आहेत.
एक्सप्रेसमधील एसीचा प्रवास महागणार

एक्सप्रेसमधील एसीचा प्रवास महागणार

लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून एसीचा प्रवास करणाऱ्यासांठी एक वाईट बातमी आहे. लवकरच एसीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. एसी ट्रेनमध्ये देण्यात येणाऱ्या बेडरोलच्या किटचे चार्ज वाढणार असून दूरांतो आणि गरीब रथ एक्सप्रेसमध्ये सुद्धा आता हे चार्ज आकारले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. बेडरोलच्या किटच्या दरात गेल्या १२ वर्षापासून कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. 
जोकोव्हिच सम्राट, 13 वे ग्रँड स्लॅम जेतेपद

जोकोव्हिच सम्राट, 13 वे ग्रँड स्लॅम जेतेपद

विम्बल्डन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने आफ्रिकेच्या केविन अँडरसन याला ६-२, ६-२, ७-६ (७-३) असे पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत फेडररसारख्या दिग्गज टेनिसपटूला पराभूत केल्यामुळे केविन अँडरसन या सामन्यात कडवी झुंज देईल, अशी अपेक्षा होती. मात्र हा सामना एकतर्फी झाला. जोकोव्हिचने कारकिर्दीतील १३वे ग्रँडस्लॅम विजेतेपद तर या स्पर्धेचे ४थे विजेतेपद पटकावले.
भीमाशंकरमधील कुंडात बुडून भाविकाचा मृत्यू

भीमाशंकरमधील कुंडात बुडून भाविकाचा मृत्यू

भीमा शंकरमधील कुंडात बुडून भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशहून आलेल्या गुरुद्याल अग्रहारी यांचा पहाटे पाण्यात बु़डून मृत्यू झाला. गुरुद्याल अग्रहारी उत्तरप्रदेशहून भाऊ आणि मित्रांसोबत आले होते. महाराष्टातील तीर्थस्थळांचे दर्शन अग्रहारी घेत होते. तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन काल रात्री ते भीमाशंकरला पोहोचले होते. तोल गेल्यामुळे ते कुंड्यात पडले होते. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more