Short News

प्रेम हा तरुण-तरुणींचा अधिकार; व्हॅलेंटाइन डे’ला तोगडियांचा हिरवा कंदील

प्रेम हा तरुण-तरुणींचा अधिकार; व्हॅलेंटाइन डे’ला तोगडियांचा हिरवा कंदील

व्हॅलेंटाइन डे'ला विरोध दर्शवणाऱ्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी यंदा व्हॅलेंटाइन डेला चक्क हिरवा कंदील दाखवला आहे. ‘प्रेम हा तरुण-तरुणींचा अधिकार असून यंदा व्हॅलेंटाइन डेच्या विरोधात आंदोलन करणार नाही' असे जाहीर करत तोगडियांनी तरुणाईला एक ‘प्रेमळ' धक्काच दिला. प्रवीण तोगडिया यांनी रविवारी चंदिगडमध्ये विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.
सिरीयामध्ये लष्कराने केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू

सिरीयामध्ये लष्कराने केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू

सीरियामध्ये सेना आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी २४ तासात केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटेनमधील संघटना 'सीरियन आब्जर्वेटरी फार ह्यूमन राइट्सने म्हटलं की, दमिश्कच्या उपनगरात केलेल्या हवाई हल्ल्यात ३२५ लोकं जखमी झाले. दमिश्क सरकारने म्हटलं की, हल्ला फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करुन करण्यात आला.
विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांचे भाऊ प्रमोद गोएंका यांचं आफ्रिकन देश मोझॅम्बिकमधून अपहरण झाल्याची माहिती आहे. शनिवारपासून प्रमोद गोएंका बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. प्रमोद काही वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायातून बाहेर पडले होते. त्यांनी स्वतःचा दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे.
सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

पीएनबी घोटाळ्यानंतर गडगडलेल्या शेअर बाजार मंगळवारी सावरलेला दिसला. आज सकाळच्या सत्रात सेंसेक्समध्ये 150 अंकाची तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीमध्ये 40 अंकाची वाढ झाली आहे. सध्या सेंसेक्स 33926.57 वर व्यवहार करत असून निफ्टी मध्ये 10417.35 अंकाची वाढ आहे. तरीही बँकेचे शेअर खाली येत आहे.