Short News

देशाच्या प्रत्येक संस्थेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कब्जा

देशाच्या प्रत्येक संस्थेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कब्जा

देशाच्या प्रत्येक संस्थेवर, यंत्रणेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कब्जा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातही संघाने त्यांची माणसे पेरली आहेत. एवढेच नाही तर सरकारचे निर्णय भाजपतर्फे नाही तर संघातर्फे घेतले जात आहेत, असा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएस आणि भाजपवर निशाणा साधला. कर्नाटकातल्या कलबुर्गी या ठिकाणी राहुल गांधी प्रचारासाठी आले होते. 
सिरीयामध्ये लष्कराने केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू

सिरीयामध्ये लष्कराने केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू

सीरियामध्ये सेना आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी २४ तासात केलेल्या हल्ल्यात ९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटेनमधील संघटना 'सीरियन आब्जर्वेटरी फार ह्यूमन राइट्सने म्हटलं की, दमिश्कच्या उपनगरात केलेल्या हवाई हल्ल्यात ३२५ लोकं जखमी झाले. दमिश्क सरकारने म्हटलं की, हल्ला फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करुन करण्यात आला.
विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण

डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांचे भाऊ प्रमोद गोएंका यांचं आफ्रिकन देश मोझॅम्बिकमधून अपहरण झाल्याची माहिती आहे. शनिवारपासून प्रमोद गोएंका बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. प्रमोद काही वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायातून बाहेर पडले होते. त्यांनी स्वतःचा दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे.
सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये किंचीतशी वाढ

पीएनबी घोटाळ्यानंतर गडगडलेल्या शेअर बाजार मंगळवारी सावरलेला दिसला. आज सकाळच्या सत्रात सेंसेक्समध्ये 150 अंकाची तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीमध्ये 40 अंकाची वाढ झाली आहे. सध्या सेंसेक्स 33926.57 वर व्यवहार करत असून निफ्टी मध्ये 10417.35 अंकाची वाढ आहे. तरीही बँकेचे शेअर खाली येत आहे.