Short News

भारतात पाकिस्तानसारखी स्थिती होत आहे - राहुल गांधी

भारतात पाकिस्तानसारखी स्थिती होत आहे - राहुल गांधी

कर्नाटकमध्ये भाजपच्या खेळीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी जोरदार टीका केली. ते सध्या छत्तीसगड दौऱ्यावर असून तेथील राजधानी रायपूरमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीकास्त्र सोडले. आरएसएस देशातील सर्व संस्थांमध्ये घुसखोरी करत आहे. संघाच्या या कृत्याची तुलना केवळ पाकिस्तान अथवा तत्सम हुकुमशाही असलेल्या देशांमध्येच होऊ शकते, असे राहुल गांधी म्हणाले. 
अनोख्या अंदाजात जॅकलीन फर्नांडिस  पाहिला का  ?

अनोख्या अंदाजात जॅकलीन फर्नांडिस पाहिला का ?

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या सलमान खानसोबतच्या आगामी ‘रेस-3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच ‘रेस-3'चे ‘हीरिए...' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. सलमानसोबतची तिची केमिस्ट्री प्रचंड प्रमाणात पसंत केली जात आहे. याचदरम्यान, जॅकलीनने तिचा नवा डान्स व्हिडीओ शेअर केला असून, त्यास केवळ 18 तासांत 12 लाख लोकांनी बघितला आहे.
परीक्षा आता होणार 15 जुलैला टीईटीची  परीक्षा

परीक्षा आता होणार 15 जुलैला टीईटीची परीक्षा

वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी सीबीएसईतर्फे 8 जुलै रोजी देशभरातील विविध केंद्रांवर राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र याच दिवशी राज्यात महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) परीक्षा घेण्याचे नियोजन होते. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने परीक्षार्थी एका परीक्षेला मुकावे लागणार होते. यामुळे टीईटी ही परीक्षा 8ऐवजी 15जुलै रोजी घेतली जाणार आहे. 
भारत सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश

भारत सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश

भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश आहे. भारताची संपत्ती 559 लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. अशिया बँक ग्लोबल वेल्थ माइग्रेशन रिव्हनुसार ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत देश हा अमेरिका आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर चीन असून चीनची संपत्ती 24,803 अब्ज डॉलर आहे. तिसऱ्या स्थानी जपान असून त्यांची संपत्ती 19,522 अब्ज डॉलर आहे.