Short News

जालियनवाला बाग येथे सरदार उधम सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण

जालियनवाला बाग येथे सरदार उधम सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण

अमृतसर येथील जालियनवाला बाग येथे स्वातंत्र्य सैनिक सरदार उधम सिंह यांच्या १० फूट उंच पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 'इंटरनॅशनल सर्व कंबोज सभा' या गैरसरकारी संस्थेच्या चार दशकांच्या मागणीनंतर या पुतळ्याची स्थापना करण्यात आली.
रोहिंग्या संकटातून बाहेर पडण्यासाठी म्यानमारची अशियान देशांकडे धाव

रोहिंग्या संकटातून बाहेर पडण्यासाठी म्यानमारची अशियान देशांकडे धाव

म्यानमार देशाची पंतप्रधान आँग सान सू की यांनी दक्षिण पूर्व अशियान देशांकडून रोहिंग्या संकटासाठी मदत मागितली आहे. सिडनी येथे झालेल्या ऑस्‍ट्रेलिया आसियान समिटच्या वेळी नेत्यांच्या बैठकीत मानव निर्मित संकटावर चर्चा झाली. यादम्यान आँग साग सू की यांनी रोहिंग्याचा मुद्दा उपस्थित करत आशियान देशांकडून मदत मागितली. आँग साग सू की यांनी माणूसकीच्या नाते मदत मागितल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले.
पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी विविध देशातील ३० ब्लॉगर केरळात दाखल

पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी विविध देशातील ३० ब्लॉगर केरळात दाखल

फ्रान्स, अमेरिका आणि जर्मनीसह विविध देशातील ३० ब्लॉगर केरळमध्ये दाखल झाले आहेत. केरळ राज्यातील समृद्ध पर्यटन क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी विविध देशातील ब्लॉगर आले आहेत. रविवारी त्यांनी केरळ राज्याची यात्रा केली. इटली,स्पेन बुलगारिया, रोमानिया, वेनेजुएला येथीलही ब्लॉगर आले आहेत. यादरम्यान ते ब्लॉग एक्सप्रेस 5 व्या अभियानादरम्यान यात्रा केली. 
'अमय पटनायक'ची बॉक्स ऑफिसवरही 'रेड', जमवला ४० कोटींचा गल्ला

'अमय पटनायक'ची बॉक्स ऑफिसवरही 'रेड', जमवला ४० कोटींचा गल्ला

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने बॉक्स ऑफिसवर चांगलीच 'रेड' मारली आहे. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून रेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला पंसती मिळत असून तीन दिवसात चित्रपटाने ४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. रविवारी चित्रपटाने जवळपास २५ टक्क्यांची वाढ नोंदवत १७ कोटींचा गल्ला जमवला. विकेंडला होणाऱ्या कमाईत 'पद्मावत'नंतर 'रेड'चा क्रमांक लागतो.