Short News

अयोध्येत आजपासून ‘राम राज्य रथयात्रे’स सुरूवात

अयोध्येत आजपासून ‘राम राज्य रथयात्रे’स सुरूवात

राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणातील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे. तत्पूर्वीच अयोध्यातून आजपासून 'राम राज्य रथ' यात्रेचा शुभारंभ होणार आहे. ही यात्रा तामिळनाडूतील रामेश्वरम येथे संपणार असून दोन महिन्यात ६ राज्यातून ही यात्रा प्रवास करणार आहे. एका टाटा मिनी ट्रकला रथाचे स्वरूप देण्यात आले आहे. ही यात्रा भाजपाशासित उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, आणि कर्नाटकमधून जाणार आहे. 
पाकचे परराष्ट्रमंत्रीही अपात्र ; इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

पाकचे परराष्ट्रमंत्रीही अपात्र ; इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

निवडणुकी दरम्यान "यूएई'चे वर्क परमिट असल्याची बाब लपविल्याप्रकरणी आज इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असीफ यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरविले. या निर्णयामुळे यापूर्वी पंतप्रधान म्हणून अपात्र ठरविलेल्या नवाज शरीफ यांच्या पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. याप्रकरणी आज तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली. यात न्यायालयाने असीफ हे अप्रामाणिक असल्याचे स्पष्ट केले.
हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, मोदींनी केली राहुल गांधींची विचारपूस

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, मोदींनी केली राहुल गांधींची विचारपूस

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच्या कर्नाटक दौऱ्यात त्यांच्या हेलिकॉप्टरशी घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर काँग्रेसने याविरोधात कर्नाटक पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. हेलिकॉप्टरमधील बिघाडामागे, आंतरराष्ट्रीय टॅम्परिंग असल्याची शंकाही काँग्रेसने व्यक्त केली आहे. यादरम्यान चीन दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना कॉल करुन विचारपूस केली. 
डायना 'मिस वर्ल्ड' कशी? विप्लव देव यांना पडला प्रश्न

डायना 'मिस वर्ल्ड' कशी? विप्लव देव यांना पडला प्रश्न

भारतात महाभारताच्या काळातही इंटरनेटचा वापर केला जात होता, असं वक्तव्य करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी विप्लव कुमार यांनी सौंदर्य स्पर्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.‘मिस वर्ल्ड' अर्थात विश्वसुंदरी डायना हेडनचा निकाल ‘फिक्स' होता, ती किताबास पात्र होती का? असा सवाल विप्लव देव यांनी उपस्थित केला.