Short News

'आणीबाणी लागू करणाऱ्यांनी आम्हाला घटनेच्या मर्यादा शिकवू नयेत'

'आणीबाणी लागू करणाऱ्यांनी आम्हाला घटनेच्या मर्यादा शिकवू नयेत'

पुरेसे पाठबळ नसतानाही भाजपला सत्ता स्थापन्यासाठी राज्यपालांनी त्यांना आमंत्रण दिले. यानंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु न्यायालयानेही भाजपच्या बाजूने कौल दिला. दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांवर टीका केली. यानंतर केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर शरसंधान साधले. देशात आणीबाणी ज्यांना लागू केली, त्यांनी घटनेच्या मर्यादा शिकवू नये,असे प्रसाद म्हणाले.
'भाजपने राज्यपालांचा वापर करून सत्ता बळकावणे यापुढे थांबवावे'

'भाजपने राज्यपालांचा वापर करून सत्ता बळकावणे यापुढे थांबवावे'

कर्नाटक विधानसभेतील घटना अपेक्षेनुसारच घडल्या आणि सत्ता बळकावण्याचे व्यर्थ प्रयत्न सोडून देणे भारतीय जनता पक्षाला भाग पडले. भाजपने राज्यपालांचा वापर करून सत्ता बळकावणे आता थांबवावे आणि जनादेशाचा विनम्रपणे आदर करावा, अशी खरमरीत टीका गोवा शिवसेनेच्या उपाध्यक्ष व प्रवक्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. भाजप राज्यपालपदाचा गैरवापर करत सत्ता बळकावत असतो. 
टी20 लीग : मुंबईचा 11 धावांनी दणदणीत पराभव

टी20 लीग : मुंबईचा 11 धावांनी दणदणीत पराभव

मुंबईसाठी महत्त्वाचा असलेल्या सामन्यात हिट मॅनचा संघाचा दणदणीत पराभव झाला. या पराभवासह मुंबईच्या बाद फेरीत जाण्याची संधीही मुंबईने गमावली आहे. दिल्लीने दिलेल्या पराभवाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाच्या नाकीनऊ लागले. दिल्लीच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईचे नामी फलंदाजींनी नांगी टाकली. मुंबईचा पूर्ण संघ 163 धावांवर गारद झाला. कर्णधार रोहित शर्माही या सामन्यातही निराशाजनक फलंदाजी केली. 
तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या 3 मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मच्छिन्नद्रनाथ चिंचोली गावात ही दुर्घटना घडली. सोमित्रा सातपुते (वय 12 वर्षे), संगीता रणमळे (वय 15 वर्षे) आणि जना रणमळे (वय 18 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. 6 मुली आज सकाळच्या सुमारास गावच्या परिसरातील तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या.