Short News

कर्नाटकात शिवसेनेचे 'डिपॉझिट' जप्त

कर्नाटकात शिवसेनेचे 'डिपॉझिट' जप्त

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप पहिला, काँग्रेस दुसरा तर जेडीएस तिसऱ्या नंबरचा पक्ष ठरला आहे. पण या तीन पक्षांशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अन्य राजकीय पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांचा धुव्वा उडाला. महाराष्ट्रातील शिवसेना , बिहारमधल्या जेडीयू आणि दिल्लीतील आप या पक्षांच्या सगळ्याच उमेदवारांवर डिपॉझिट गमावण्याची वेळ आली.  
नवी मुंबईत शाळेचा गेट अंगावर पडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

नवी मुंबईत शाळेचा गेट अंगावर पडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

शाळेचा गेट पडून एका मुलाचा मृत्यू आणि एक मुलगा जखमी झाल्याची घटना नवी मुंबईत घडली. कोपरखैरणेमधील महापालिकेची ही शाळा आहे. शाळेचं काम सुरु असून शाळेच्या आवारात ही मुलं खेळत असताना ही घटना घडली. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर- 11 मध्ये असलेल्या महापालिकेच्या शाळेच्या इमारतीचं काम सुरु आहे. शाळेच्या आवाराला गेट लावलं आहे, मात्र ते गेट लावताना कोणताही खबरदारीचा उपाय घेतला नसल्याचा आरोप होतोय.
होय आम्ही कुत्रे आहोत : हितेंद्र ठाकूर

होय आम्ही कुत्रे आहोत : हितेंद्र ठाकूर

भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेना आणि भाजप यांनी कुत्रे-मांजर संबोधल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या पालघरमध्ये पातळी सोडून प्रचार सुरु आहे. होय आम्ही कुत्रे आहोत. तीस वर्षांपासून वफादार कुत्र्यासारखं लोकांबरोबर, मतदारांबरोबर आम्ही इमानदार आहोत. असंही हितेंद्र ठाकूर यांनी दरडावून सांगितलं.
रोहिंग्यांच्या घरवापसीसाठी हसीनांनी मागितली मोदींची मदत

रोहिंग्यांच्या घरवापसीसाठी हसीनांनी मागितली मोदींची मदत

मानवतेच्या नात्याने आम्ही रोहिंग्या निर्वासितांना आमच्या देशात आश्रय दिला पण आता त्यांना मायदेशी परत पाठवण्यासाठी भारताने आमची मदत करावी असं आवाहन बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांनी कोलकत्यामध्ये एका कार्यक्रमात आज पंतप्रधान मोदींना केलं आहे. २०१७ साली सात लाख रोहिंग्यांनी म्यानमार बाहेर पलायन केलं. यातल्या बहुतांश रोहिंग्यांनी बांग्लादेशमध्ये आश्रय घेतला.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more