Short News

टीडीपी सरकारविरोधात पुन्हा आणणार अविश्वास दर्शक ठराव

टीडीपी सरकारविरोधात पुन्हा आणणार अविश्वास दर्शक ठराव

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे दक्षिण भारतातील महत्त्वाचे साथीदार होते. मात्र आंध्रप्रदेशाला विशेष दर्जा देण्याच्या त्यांच्या मागणीवरुन भाजप व त्यांच्या पक्षामध्ये वाद झाले. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नायडू यांचा पक्ष केंद्र सरकाविरोधात पुन्हा अविश्वासदर्शक ठराव आणणार आहे. 
'धडक'मधील इसानला मिळाले 30 लाख रुपये मानधान ,तर..जान्हवीला ?

'धडक'मधील इसानला मिळाले 30 लाख रुपये मानधान ,तर..जान्हवीला ?

निर्माता करण जोहर दिग्दर्शक शशांक खेतान यांचा 'धडक' सिनेमा थिएटर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.'धडक' सिनेमाचे बजेट 70 कोटींचे होते त्यातले 50 कोटी सिनेमा तयार करणाऱ्यावर खर्च करण्यात आले आहे. आशुतोष राणा यांना 50 लाख मानधन देण्यात आले आहे. तेच या सिनेमासाठी संगीतकार जोडी अजय-अतुल या दोघांना 1.5 कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले. तर इसान आणि जान्हवीला 30 रुपये मानधन मिळाले आहे. 
India Vs England : अनुभवाच्या जोरावर चांगली कामगिरी करू - अश्विन

India Vs England : अनुभवाच्या जोरावर चांगली कामगिरी करू - अश्विन

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला काही दिवसांत सुरुवात होणार आहे. या मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवण्यासाठी आर. अश्विनने खास रणनीती आखली आहे. ग्लंडचा दौरा हा माझ्यासाठी खास आहे. इंग्लंडमध्ये फिरकीला पोषक खेळपट्टी नसते, असे म्हटले जाते. पण हेच फिरकीपटूसाठी मोठे आव्हान असते. हे आव्हान अनुभवाच्या जोरावर मी नक्कीच पूर्ण करेन, असे अश्विनने सांगितले. 
राहुल गांधींविरोधात हक्‍कभंग प्रस्‍ताव आणणार भाजप

राहुल गांधींविरोधात हक्‍कभंग प्रस्‍ताव आणणार भाजप

काँग्रेस अध्‍यक्ष राहुल गांधींविरोधात भाजप हक्‍कभंग प्रस्‍ताव आणणार, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी दिली. आज लोकसभेत खोटी माहिती देऊन त्‍यांनी सभागृहाची दिशाभूल केली, असा आरोप त्‍यांच्‍यावर करण्‍यात आला आहे. मात्र हा हक्‍कभंग प्रस्‍तावर नेमका केव्‍हा आणला जाणार हे अद्याप स्‍पष्‍ट होऊ शकले नाही. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more