Short News

केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेलांकडे पाहून अश्लिल इशारे , 3 जणांना अटक

केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेलांकडे पाहून अश्लिल इशारे , 3 जणांना अटक

केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्यासोबत असभ्य वर्तन करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मिर्झापूर या त्यांच्या लोकसभा मतदार संघातून वाराणसीला परतत असताना रविवारी रात्री ही घटना घडली. मिर्झापूर येथून एक कार्यक्रम संपल्यानंतर पटेल या त्यांच्या ताफ्यासोबत वाराणसीला परतण्याच्या मार्गावर होत्या. शास्त्री पुलावरुन जात असताना मागून सुसाट आलेल्या फोर्ड कारमधील 3 तरुणांनी अश्लिल इशारे केले.  
आज सोने चमकले, चांदीच्या दरात मात्र घसरण

आज सोने चमकले, चांदीच्या दरात मात्र घसरण

आज सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. या दर वाढीसह प्रतिदहा ग्रामसाठी सोन्याचा दर 31900 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही ही तेजी दिसली. तर चांदीच्या दरात मात्र आज घसरण झालेली दिसली. चांदीच्या दरात 190 रुपयांची घसरण झाली. यासह चांदी 41000 रुपये प्रतिकिलो रुपये झाली आहे. यामुळे चांदी घेणाऱ्याची चांदी झाली तर सोने घेणाऱ्या ग्राहकांना थोडा अधिक आर्थिक भार सोसावा लागला. 
'पगडी' राजकारण करून मराठी माणसात फूट पाडण्याचा डाव'

'पगडी' राजकारण करून मराठी माणसात फूट पाडण्याचा डाव'

शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षाच्या 52 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना 'पगडी'वादावर भाष्य केले. दैवतांच्या पगड्यांचे राजकारण करू नका. पगड्यांचे राजकारण करणाऱ्यांना मराठी माणूस धडा शिकवील, अशा शब्दांत ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्ला केला. पगड्यांमुळे लोक प्रसिध्द झाले असून लोकांच्या कार्यामुळे पगड्या प्रसिध्द झाल्या आहेत असे म्हटले. 
'भारत' या चित्रपटासाठी हॉलिवूड रिटर्न प्रियंकाने वाढला  भाव

'भारत' या चित्रपटासाठी हॉलिवूड रिटर्न प्रियंकाने वाढला भाव

बॉलिवूडचा दाबंगस्टार सलमान खानच्या 'रेस3'ला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. रेस 3 नंतर सलमान खान 'भारत' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. भारत' या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत अभिनेत्री प्रियंका चोप्रा एकत्र दिसणार आहे. मात्र हॉलिवूडमध्ये रमलेली प्रियंकाने या सिनेमासाठी आपला भाव वाढल्याचे दिसत आहे. हॉलिवूडमध्ये रमलेल्या प्रियंकाने 14 कोटींची मागणी केली होती. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more