Short News

२७५० लोकांनी पाहिली फेसबुकवर लाइव्ह आत्महत्या

२७५० लोकांनी पाहिली फेसबुकवर लाइव्ह आत्महत्या

पाचवेळा प्रयत्न करुनही भारतीय लष्करात भरती न होऊ शकल्याने नाराज झालेल्या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने आत्महत्या करताना फेसबुकवर लाइव्ह करत आपल्या आत्महत्येचं कारण स्पष्ट केलं. धक्कादायक म्हणजे तरुण फेसबुक लाइव्ह करत असताना २७५० जण पाहत होते, मात्र एकानेही त्याच्या कुटुंबाला किंवा पोलिसांना फोन करुन कळवलं नाही.
स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा हल्ला

स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा हल्ला

झारखंडच्या पाकुड जिल्ह्यात स्वामी अग्निवेश यांना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून स्वामी अग्निवेश यांच्या दौऱ्याचा निषेध सुरू असताना हा प्रकार घडला. यावेळी कार्यकर्त्यांनी 'अग्निवेश गो बॅक' अशा घोषणा दिल्या. घोषणा देत असतानाच कार्यकर्त्यांनी अग्निवेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अग्निवेश यांना धक्काबुक्की करुन जमिनीवर पाडत त्यांचे कपडे फाडले.   
इंग्लंडने जिंकली नाणेफेक; घेतला गोलंदाजीचा निर्णय

इंग्लंडने जिंकली नाणेफेक; घेतला गोलंदाजीचा निर्णय

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वन डे मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहेत. हा सामना लीड्स येथील मैदानात होत आहे. गेल्या लढतीत मधल्या फळीतील फलंदाजांनी पुरक साथ न दिल्याने भारतीय संघाला फटका बसला होता. 
11 वर्षीय बालिकेवर 7 महिन्यांपासून 18 जणांकडून गँगरेप

11 वर्षीय बालिकेवर 7 महिन्यांपासून 18 जणांकडून गँगरेप

चेन्नईच्या अयानवरम परिसरात 11 वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. 18 आरोपी 7 महिन्यांपासून चिमुरडीवर रेप करत होते. गँगरेप करणाऱ्या नराधमांमध्ये अपार्टमेंटमध्ये नोकरीला असलेला सिक्युरिटी गार्ड, लिफ्ट ऑपरेटर, प्लंबर आणि एवढेच नव्हेतर दररोज इमारतीला पाणीपुरवठा करणाराही सामील आहे. गुंगीचे औषध खाऊ घालून बेशुद्ध करायचे, यानंतर चिमुरडीवर बलात्कार केला जात. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more