Short News

शरीफ यांच्या अटकेसाठी 10 हजार पोलीस  तैनात

शरीफ यांच्या अटकेसाठी 10 हजार पोलीस तैनात

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम शरीफ लाहोरला जात आहेत. भ्रष्टाचारप्रकरणात त्यांना आज अटक करण्यात येण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचारप्रकरणात शरीफ आणि मरियम दोषी आढळले असल्याने त्यांना पाकिस्तानात परताच अटक होणार आहे. पाकिस्तान मुस्लिम लिगचे नेते नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम सध्या लंडनहून पाकिस्तानकडे जाण्यासाठी रवाना झाले. 
इंग्लंडमध्ये होणार सचिन तेंडुलकरची क्रिकेट अॅकेडमी

इंग्लंडमध्ये होणार सचिन तेंडुलकरची क्रिकेट अॅकेडमी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं त्याच्या क्रिकेट अॅकेडमीची घोषणा केली आहे. पण सचिन तेंडुलकरची ही क्रिकेट अॅकेडमी भारतात नाही तर इंग्लंडमध्ये असणार आहे. इंग्लंडमधल्या मिडलसेक्स क्लबसोबत सचिननं करार करून ही अॅकेडमी उभारली आहे. तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकेडमी असं या अॅकेडमीचं नाव असणार आहे. या अॅकेडमीमध्ये ९ ते १४ वर्षांमधल्या खेळाडूंना क्रिकेटचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे.
एल्फिन्स्टन रोड नव्हे, आता ‘प्रभादेवी’

एल्फिन्स्टन रोड नव्हे, आता ‘प्रभादेवी’

मंजूर होऊन तब्बल १२ महिन्यांपासून अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत असलेल्या एल्फिन्स्टन रोडच्या नामांतराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव ‘प्रभादेवी' झाले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. २९ सप्टेंबर २०१७ रोजी एल्फिन्स्टन रोडचे नाव प्रभादेवी असे करण्यात येणार होते. मात्र त्याच दिवशी दुर्घटना घडल्याने नामांतराचा विषय पुन्हा मागे पडला.
दूध दरवाढ आंदोलन चिघळलं, बुलडाण्यात एसटी बसची तोडफोड

दूध दरवाढ आंदोलन चिघळलं, बुलडाण्यात एसटी बसची तोडफोड

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रतिलीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दिल्ली आणि नागपुरात बैठका झाल्या. मात्र या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या. दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या परिवहन मंत्रालयाच्या दालनात बैठक पार पडली. मात्र या बैठकीत दूध दरावर कुठलाही तोडगा निघाला नाही.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more