Short News

मौल्यवान पर्स वाचवण्यासाठी महिला चक्क स्कॅनिंग मशीनमध्ये शिरली

मौल्यवान पर्स वाचवण्यासाठी महिला चक्क स्कॅनिंग मशीनमध्ये शिरली

मौल्यवान पर्स वाचवण्यासाठी एक महिला चक्क स्कॅनिंग मशीनमध्ये शिरली. विशेष म्हणजे सुरक्षा रक्षकांनी तिला हा मूर्खपणा करण्यापासून रोखलं नाही. चीनमधल्या एका रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला आहे. रेल्वे स्थानकात बॅग स्कॅन करण्यासाठी या महिलनं नकार दिला. आपली महगाडी बॅग आणि मौल्यवान वस्तू स्कॅनरमध्ये गेल्या तर सुरक्षा रक्षक त्याला नुकसान पोहोचवतील अशी भीती तिला वाटली त्यामुळे ती स्कॅनरमध्ये शिरली
अमेरिकेच्या विरोधात पाकला सौदी अरेबिया,तु्र्कस्तान, चीनची मदत

अमेरिकेच्या विरोधात पाकला सौदी अरेबिया,तु्र्कस्तान, चीनची मदत

अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारी फंडिग बंद करण्यात आली. परंतु अमेरिकेच्या या निर्णयाविरोधात पाकिस्तानच्या बाजूने चीन , सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान उभे राहिले आहेत. अमेरिकेच्या माध्यमांनी याविषयीची वृत्त दिले आहे. पाकिस्तान याला आपले यश मानत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे ट्रम्प प्रशासन आपले दहशतवादाविरोधात आपले प्रयत्न करत आहेत. 
अभिनेता इरफान खानला काविळने झपाटले

अभिनेता इरफान खानला काविळने झपाटले

अभिनेता इरफान खान सध्या काविळने त्रस्त झाला आहे. त्याच्या या आजारामुळेच त्याच्या सिनेमांचे चित्रीकरणही थांबवण्यात आले आहे. इरफानला द मिनस्ट्री या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी पंजाबला जायचे होते. या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर लगेच तो ब्लॅकमेल या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनला सुरूवात करणार होता. पण आता काविळ झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे.
जोगेश्वरीत केमिकल कंपनीला भीषण आग

जोगेश्वरीत केमिकल कंपनीला भीषण आग

जोगेश्वरी येथील धील ईशांत कंपाऊंडमधील एशियन केमिकल कंपनीला गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थ असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु आहे.