Short News

ट्रम्प यांच्यावर आरोप करणाऱ्या पॉर्नस्टारला अटक

ट्रम्प यांच्यावर आरोप करणाऱ्या पॉर्नस्टारला अटक

पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियल हिला ओहियोमधील एका स्ट्रिप क्लबमधून अटक करण्यात आली आहे. तिच्यावर एका ग्राहकाला कथित स्वरुपात स्पर्श केल्याचा आरोप आहे. याबाबतची माहिती स्टॉर्मी डेनियल हिच्या वकिलाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. कोलंबस ओहिओमध्ये एका स्ट्रिप क्लबमध्ये माझी क्लायंट स्टॉर्मी डेनियनला अटक करण्यात आल्याचे ट्विट स्टॉर्मी डेनियल हिचे वकील मायकल एवेनट्टी केले. 
कोर्ट मॅरेजसाठी जाणाऱ्या मुलीला वडिल आणि भावाने जिवंत जाळले

कोर्ट मॅरेजसाठी जाणाऱ्या मुलीला वडिल आणि भावाने जिवंत जाळले

कोर्ट मॅरेज करण्यासाठी एक मुलगी घरातून बाहेर पडली, त्यावेळी तिच्या वडिलांनी आणि भावाने तिला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न करायला चालली म्हणून या मुलीला जिवंत जाळण्यात आले. भाजपशासित मध्यप्रदेशात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत या मुलीचा जागीच मृत्यू झाला. मध्यप्रदेशातील भोपाळपासून २५०किमी अंतरावर खंडवा जिल्ह्यात ही अंगावर काटे आणणरी घटना घडली.
निधी आणि राहुलचे  लंडनमधले फोटो व्हायरल

निधी आणि राहुलचे लंडनमधले फोटो व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज लोकेश राहुल आणि अभिनेत्री निधी अग्रवाल यांना एकत्र पाहिलं गेलं होतं. त्यांच्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. मात्र त्यानंतरही हे जोडपं अनेक वेळा एकत्र दिसून आलं होतं. मात्र सध्या त्यांच्या लंडन भेटीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून हे दोघं लंडनमध्ये त्यांच्या क्वालिटी टाईम व्यतीत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 
गिर्यारोहकांनी शोधले 50 वर्षांपूर्वी विमान अपघातात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह

गिर्यारोहकांनी शोधले 50 वर्षांपूर्वी विमान अपघातात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह

50 वर्षांपूर्वी झालेल्या एका भीषण विमान अपघातात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह गिर्यारोहकांनी शोधून काढले आहेत. 1968 साली हिमाचल प्रदेशमधील लाहोल येथील पर्वतरांगांमध्ये भारतीय हवाई दलाचे एएन-12 हे विमान अपघातग्रस्त झाले होते. चंदीगड येथून लेह येथे जात असलेल्या या विमानातून सुमारे 102 जण प्रवास करत होते. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more