Short News

पॅलेस्टाइनच्या पंतप्रधानांच्या ताफ्यावर बॉम्ब हल्ला

पॅलेस्टाइनच्या पंतप्रधानांच्या ताफ्यावर बॉम्ब हल्ला

पॅलेस्टाइनचे पंतप्रधान रमी हमदल्लाह बॉम्ब हल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्यांच्या ताफ्यावर जबालिया येथे बॉम्बहल्ला झाला. पंतप्रधान या भागात दौरा करण्याची ही दुर्मिळ घटना आहे. गाझातील दहशतवाद्यांनी पंतप्रधानांना ठार करण्यासाठी कट रचला होता, असे त्यांच्या फतह पार्टीने सांगितले. इरेझ क्रॉसिंग या इस्रायली सीमेजवळून ताफा जात असताना हा हल्ला करण्यात आला. सुदैवाने पंतप्रधान हमदल्लाह हे सुखरूप आहेत.
'भगतसिंग-सुखदेव-राजगुरु यांना शहिदांचा दर्जा द्या'

'भगतसिंग-सुखदेव-राजगुरु यांना शहिदांचा दर्जा द्या'

देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांना जशास तशे उत्तर द्यावे, अशा विद्रोही विचारांनी भारलेले क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना सरकारने अद्या अधिकृतरित्या शहिदांचा दर्जा दिलेला नाही. त्यांना राष्ट्रीय शहीद म्हणून लवकरात लवकर दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सुखदेव यांच्या वारसदारांनी शुक्रवारी त्यांच्या स्मृतीदिनी केली आहे. ‘
सौदीच्या हवाई क्षेत्रातून गेले इस्राइलला भारताचे पहिले विमान

सौदीच्या हवाई क्षेत्रातून गेले इस्राइलला भारताचे पहिले विमान

भारत आणि इस्राइल यांच्यातील संबंधांचा एक नवा मार्ग गुरुवारी सुरु झाला आहे. गुरुवारी एअर इंडियाचे विमान पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या आकाशातून प्रवास करत इस्त्राइलमधील बेन गुरियन एअरपोर्टवर पोहोचले. सौदी अरेबियाने इस्राइलला जाणाऱ्या विमानांना आपल्या आकाशाचा वापर करू देण्याची ही पहिलीच वेळ आहे. एअर इंडियाचे 139 विमान तब्बल साडे सात तासांचा प्रवास करून गुरुवारी बेन गुरियन विमानतळावर पोहोचले. 
..तर पाकिस्तान स्टिरॉइड घेतलेला इराण बनेल - जॉन बोल्टन

..तर पाकिस्तान स्टिरॉइड घेतलेला इराण बनेल - जॉन बोल्टन

पाकिस्तान हा कट्टर इस्लामिक आणि दहशतवादी होण्याच्या काठावर आहे. जर परिस्थिती नीट हाताळली नाही तर हा देश म्हणजे स्टिरॉइड घेतलेला इराण किंवा उत्तर कोरिया होईल, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी म्हटले आहे. जॉन बोल्टन या आंतरराष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तिची या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे.