Short News

ब्रिटनची युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात प्रवेश करणार

ब्रिटनची युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात प्रवेश करणार

दक्षिण चीन समुद्रात संचाराचे स्वातंत्र्य प्रत्येक देशाला आहे,हे दाखवून देण्यासाठी ब्रिटनची युद्धनौका येथून प्रवास करणार आहे.हे सागरी क्षेत्र आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्र आहे,असा दावा आंतरराष्ट्रीय समुदायाचा आहे. ब्रिटनची युद्धनौका ऑस्ट्रेलियाहून रवाना होईल.पाणबुडीरोधक युद्धनौका एचएमएस सदरलँड या आठवड्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाला पोहोचेल, असे ब्रिटनचे संरक्षण सचिव गॅव्हिन विल्यम्सन यांनी सांगितले. 
'खली बली' आता 'गंगनम' स्टाइलमध्ये

'खली बली' आता 'गंगनम' स्टाइलमध्ये

पद्मावत' चित्रपटातील 'खली बली' हे गाणंही असंच सोशल मीडियावर नवनवीन वर्जन्ससह हिट ठरतंय. रणवीर सिंगवर चित्रित केल्या गेलेल्या या गाण्यात त्याने अप्रतिम ऊर्जा दाखविल्यानं हे मूळ गाणं प्रेक्षकांना चांगलंच भावलं. आता या गाण्याच्या वर्जन्सनींही प्रेक्षकांना भुरळ घातलीय. सोशल मीडियावर 'खली बली'च्या नवनवीन वर्जन्समध्ये सर्वाधिक हिट ठरतंय ते त्याचं 'गंगनम' स्टाइल वर्जन.
जर्मनीत गुंजली कुछ कुछ होता है ची धून

जर्मनीत गुंजली कुछ कुछ होता है ची धून

द स्टटरागार्ट चेंबर या जर्मन ऑर्केस्ट्राने (वाद्यवृंदाने) ‘तुम पास आए... यू मुस्कुराए' या गाण्यावर सुंदर सादरीकरण करत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच दिला. या गाण्याची धुन अनोख्या आणि तितक्याच प्रभावी पद्धतीने सादर करणाऱ्या या वाद्यवृंदाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही फारच कमी वेळात व्हायरल झाला आणि करण जोहरपर्यंतही पोहोचला.
आशिक बनाया आपने गाण्यावरील या मुलीचा डान्स पहाच...
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/gepf8kjRXgA" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen></iframe>

आशिक बनाया आपने गाण्यावरील या मुलीचा डान्स पहाच...

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रोतेला आणि करण वाहीच्या हेट स्टोरी 4 चे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. अलिकडेच त्याचे पहिले गाणे आशिक बनाया आपने देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. आता या गाण्यावर डान्स करतानाचा एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा तरूणाईला चांगलाच भावला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सोनाली असे या मुलीचे नाव आहे.